मुंबई : कोरोना विषाणूचा नवीन स्ट्रेन 'डेल्टाप्लस'चे रुग्ण (Delta plus virus) आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. राज्यातील 'डेल्टाप्लस'ची लागण झालेल्या २१ रुग्णांचे लसीकरण (Delta plus vaccination) झाल्याची शक्यता धुसर असल्याची माहिती समोर आली आहे. 'राज्यभर पसरलेल्या या रुग्णांपैकी बहुतांश रुग्णांचे लसीकरण झालं नाहीये. डेल्टाप्लसबाधित (Delta plus Infected) रुग्णांची माहिती गोळा करण्याचं काम सुरु आहे, असं प्राथमिक माहिती अहवालात निदर्शनात आलंय. (Maharashtra Delta plus Infected patients possibly not vaccinated )
राज्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे (साथरोग विज्ञान ) अधिकारी डॅा.प्रदिप आवटे अशी माहिती दिली आहे की, 'यातील तीन रुग्ण १८ वर्षांखालील असून लसीकरणासाठी ते पात्र नाहीत. 'राज्य सरकारकडून डेल्टाप्लसचा संसर्ग झालेल्या जिल्ह्यांमध्ये आगामी काळात तातडीने प्रभावी लसीकरण मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या ज्या भागात डेल्टाप्लस व्हेरियंटचा संसर्ग झाला आहे त्या भागात बारकाईने निरिक्षण सुरु आहे. या भागात आम्ही कोरोना चाचण्या आणि लसीकरण वाढवलं आहे, अशी माहिती राष्ट्रीय आरोग्य मंडळाचे आयुक्त एन.रामास्वामी यांनी दिली आहे.
रत्नागिरीत आढळलेल्या ९ कोरोनाबाधित रुग्णांमध्ये डेल्टाप्लसचे व्हेरियंट सापडले आहेत. यात ७ जळगाव,२ मुंबई आणि ठाणे, पालघर आणि सिंधूदुर्ग जिल्ह्यातून प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून काही नमुने दिल्लीच्या इन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक्स अॅंड इंटिग्रेटिव्ह बायोलॅाजी मध्ये अनुवंशीक क्रमवारीसाठी पाठविण्यात आले आहेत. या नमुन्यांच्या निकालाची प्रतिक्षा होत आहे. ज्या २१ जणांना डेल्टारप्लसची लागण झाली आहे त्यामागे कोणती कारणे आहेत याचं संधोधन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. यात बहुतांश रुग्ण हे रत्नागिरीच्या शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांनी आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नाही. तसंच जिल्ह्याबाहेरही ते फिरले नाहीत, अशी माहिती डॅा.फुले यांनी दिली आहे.
डेल्टाप्लसचं संसर्ग झालेल्या ४८ रुग्णांचे नमुन्यांच्या अनुवंशीक क्रमवारी निकालाची प्रतिक्षा आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलंय. तसंच हा डेल्टाप्लस व्हेरियंट जास्त प्रमाणात संसर्ग वाढवू शकतो. विदर्भात विलगीकरणात असलेल्या पहिल्या व्हेरियंट हा दुसऱ्या लाटेला कारणीभूत ठरला आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.