Mumbai News : लोकशाही, माणुसकीवर बुलडोजर फिरवू नका; शाहिद आझमी व्याख्यानमालेत वक्त्यांचा सूर

जेव्हा एका वस्तीवर बुलडोजर फिरवला जातो तेव्हा घरासोबत देशाचे संविधान, लोकशाही, माणुसकी आणि जगण्याच्या अधिकारावरही बुलडोजर चालतो.
bulldozer
bulldozersakal
Updated on

मुंबई - जेव्हा एका वस्तीवर बुलडोजर फिरवला जातो तेव्हा घरासोबत देशाचे संविधान, लोकशाही, माणुसकी आणि जगण्याच्या अधिकारावरही बुलडोजर चालतो. घर नसेल तर देशाचे नागरीक म्हणून सिध्द करणारे कागदोपत्री पुरावेही नष्ट होतात. त्यामुळे बुलडोजर अन्याय खांबला पाहीजे असा सूर दिवंगत शाहिद आझमी स्मृती वाख्यानमालेत उमटला.

शुक्रवारी (ता. ९) मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या या व्याख्यानमालेत बुलडोजर न्यायावर डॉ. आनंद तेलतुंबडे, सामाजिक कार्यकर्ते इरफान इंजिनीयर,मारुख अदेनवाला, डॉ. जियाउद्दीन सिद्दीकी यांनी आपली मते मांडली.

मुंबईत अलिकडे मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी वस्त्यांवर बुलडोजर फिरवला जात आहे. त्यात २०, ३० वर्षापुर्वीची घरे तोडली जात आहे. घरे तोडण्यापुर्वी नोटीसही दिली जात नाही. म्हणजे कायदेशीर आहोत हे सिध्द करण्याची संधीही नाकारली जात आहे. असे मानवी हक्क कार्यकर्त्या मारुख अदेनवाला यांनी सांगीतले. घरांच्या बाबतीत कायदेशीर त्रृट्या असतीलही मात्र याचा अर्थ लोंकाना बेघर करणे असा होता नाही.

असे अदेननाला म्हणाल्या. सर्वोच्च न्यायालयाने घर हा मूलभूत अधिकार मानला आहे. याची आठवण करुन देतांना देशात नागरीक म्हणून मूलभूत सुविधा मिळवण्यासाठी रेशन, आधार कार्ड आणि मतदान कार्ड महत्वाचे आहे.त्यासाठी घराचा पत्ता लागतो. मात्र घरच उध्वस्त केले तर या सर्व सोयी,सुविधा नाकारल्या जातील अशी भिती अदेनवाला यांनी व्यक्त केली.

नॅरेटीव्ह बदला

सध्या एका विशिष्ट एका समुदायाची घरे तोडल्याचा आनंद इतर समुदाय साजरा करतात. यासाठी त्या समुदायाविरुध्द केली जाणारी द्वेषपुर्ण भाषणे जबाबदार आहे. असे सामाजिक कार्यकर्ते इरफान इंजिनीयर यांनी सांगीतले. मात्र मुस्लीम समुदायाने आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. मुस्लीम समाज देवबंदी. शिया, सुन्नीत विभागला गेला आहे.

अनेकजण धर्म संविधानाच्या वर मानतात. त्यामुळे मुस्लीम समुदायाने समदुखी असलेल्या दलित, ओबीसी, आदिवासी बांधवासोबत मिळून काम करायला पाहीजे. त्यांच्या दुखात सहभागी व्हायला हवे. तेव्हाच मुस्लीम समाजाबद्दलचे पसरवले जात असलेले चुकीचे नॅरेटीव्ह बदलने शक्य होईल असे ते म्हणाले.

संघर्षासाठी सज्ज रहा

भाजपने सर्व जातींना एकत्र करुन हिंदू फ्रेमवर्कमध्ये आणले आहेत. ते मजबूत करण्यासाठी ते १४ टक्के मुस्लीमांना लक्ष्य करत असल्याचे डॉ आनंद तेलतुंबडे यांनी सांगीतले. कळत नकळत इतर मागासवर्गीय समाज त्‍यांच्यासाठी काम करतो. हा सर्व अन्याय अजून काही काळ सुरु राहणार आहे. संघर्षासाठी तयार राहीले पाहीजे.मात्र यासाठी मुस्लीम समाजानेही एकटे न राहता इतरांसोबत संबध ठेवले पाहीजे. असे तेलतुंबडे यांनी सागीतले.यावेळी त्यानी शाहिद आझमी यांच्या अनेक आठवणी सांगीतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.