मुंबईः भिवंडीमधील धोकादायक इमारत दुर्घटनाची दखल घेत कल्याण डोंबिवली महानगर पालिकेनं आजपासून अतिधोकादायक इमारत तोडण्यास सुरुवात केली आहे. शिवाजी चौक मधील 40 वर्ष जुनी तीन मजली इमारत तोडण्यास सुरुवात केलीय. कल्याण डोंबिवली महानगर पालिका हद्दीत एकूण 471 धोकादायक इमारत असून पावसाळा आला की पालिका सर्वेक्षण करून त्या इमारतींना नोटीस बजावत असते. तसंच पालिकेनं पालिका हद्दीतील जाहीर केलेल्या अतिधोकादायक इमारतीवर कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी दिलेत.
कल्याण पश्चिम मधील अतिधोकादायक इमारत तोडण्याचे काम सलग दुसऱ्या दिवशी काम सुरू असून पालिका हद्दीत धोकादायक प्रश्नाबाबत पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, पालिकेने पालिका हद्दीतील जाहीर केलेल्या अतिधोकादायक इमारत जाहीर केल्या आहेत त्यात नागरिक राहत नाहीत त्यावर त्वरीत कारवाई करा असे आदेश दिल्याचं त्यांनी स्पष्ट केले. यामुळे प्रभाग क्षेत्र अधिकारी वर्गाची धावपळ सुरू झाली आहे. नव्यानं धोकादायक इमारत पाहणी करून अहवाल देण्यात येणार आहे आणि त्यानंतर कारवाईला सुरुवात होणार असल्याचे समजते.
कल्याण डोंबिवली महानगर पालिका हद्दीत पालिकेनं सर्वेक्षण केल्यानुसार पालिका हद्दीत धोकादायक इमारत 284 तर अतिधोकादायक 187 असे एकूण 471 धोकादायक इमारती आहेत. कल्याण डोंबिवली मनपा हद्दीत 10 प्रभाग क्षेत्र कार्यालय आहेत.
अ प्रभागामध्ये धोकादायक 4 ,अतिधोकादायक 2
ब प्रभागामध्ये धोकादायक 11,अतिधोकादायक 10
क प्रभागामध्ये धोकादायक 54 ,अतिधोकादायक 102
ड प्रभागामध्ये धोकादायक 1, अतिधोकादायक 6
जे प्रभाग क्षेत्र धोकादायक 32 ,अतिधोकादायक 2
फ प्रभाग क्षेत्र कार्यालय धोकादायक 144 , अतिधोकादायक 16
ह प्रभाग क्षेत्र धोकादायक 25, अतिधोकादायक 15
ग प्रभागात धोकादायक 8, अतिधोकादायक 32
ई प्रभागात धोकादायक 5, अतिधोकादायक 2
आय प्रभागात शून्य
पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांच्या आदेशनुसार प्रभागक्षेत्र अधिकारी कारवाई कधी सुरू करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाड आणि भिवंडी धोकादायक इमारत दुर्घटना झाल्यावर पालिका सतर्क झाली होती.
तीन दिवसांपूर्वी कल्याण पश्चिम शिवाजी चौक कृष्णा टॉकीज आवारातील तीन मजली इमारतीचा काही भाग कोसळल्याने पालिका आयुक्तांनी दिलेल्या आदेश तोडक कारवाई सुरू झाली. 40 वर्ष जुनी आणि तीन मजली इमारत होती. त्यात 10 गाळेधारक , आणि 1 कार्यालय होते. सदर इमारतीला नोटीस ही बजावली होती. प्रभाग क्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे यांच्या पथकाने बाजार पेठ पोलिस बंदोबस्तात 1 पोकलेन, 1 जेसीबीच्या मदतीने सदर इमारत निष्कासित करण्यास सुरुवात केली आहे.
तत्पुर्वी तळमजल्यावरील सर्व दुकानांचे गाळे रिकामे करण्याचे काम सुरू होते. पालिका हद्दीत 471 धोकादायक इमारत असून त्यातील अतिधोकादायक इमारत आजपासून तोडण्यास सुरुवात केल्याची माहिती पालिका उपायुक्त सुधाकर जगताप यांनी दिली.
-------------------------
(संपादनः पूजा विचारे)
Demolition dangerous building begins Kalyan orders Municipal Commissioner
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.