Department of Transport : परिवहनच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा कनिष्ठ पदावर डोळा कशासाठी?

परिवहन विभागात लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीने भरण्यात येणारे प्रशासकीय अधिकारी पदावर वरिष्ठ श्रेणीचे सहाय्यक परिवहन आयुक्तांची नियुक्ती केली आहे.
Department of Transport
Department of Transportsakal
Updated on

मुंबई - परिवहन विभागात लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीने भरण्यात येणारे प्रशासकीय अधिकारी पदावर वरिष्ठ श्रेणीचे सहाय्यक परिवहन आयुक्तांची नियुक्ती केली आहे. या दोन पदांमध्ये वेतन श्रेणीचा सुद्धा फरक आहे. त्यानंतरही वरिष्ठ असलेल्या सहाय्यक परिवहन आयुक्त दीपक शिंदे यांची कनिष्ठ पदावर नियुक्ती कशासाठी हा चर्चेचा विषय ठरला आहे.

परिवहन विभागाने शिंदे यांची नियुक्तीची तडकाफडकी आदेश काढून अंमलबजावणी सुरू केली असल्याने मोटार वाहन विभागातील कर्मचारी संघटनेने या बेकायदा नियुक्तीविरोधात परिवहन आयुक्तांकडे तक्रार केली आहे.

राज्य परिवहन विभागात प्रशासकीय अधिकाऱ्यांचे कनिष्ठ लिपीक वर्गाच्या पदोन्नतीने भरणारे पद आहे. त्या पदाचा अनधिकृत कारभार गेल्या अनेक वर्षांपासून दिपक शिंदे सांभाळत आहे. त्याशिवाय महादेव बिनेकर यांच्याकडेही प्रशासकीय अधिकाऱ्यांची नामधारी जबाबदारी दिली आहे. मात्र, प्रत्यक्षात दिपक शिंदे यांच्याकडे जास्त अधिकार यावे म्हणून बिनेकर यांच्यावर सोपवण्यात आलेला अतिरीक्त कारभार रद्द करून त्यांना मुंबई मध्य आरटीओ कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहे.

याप्रकरणामूळे मोटार वाहन विभागातील कर्मचारी संघंटना संतप्त झाली असून, तब्बल ४५ कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षरीचे तक्रार पत्र परिवहन आयुक्तांना देण्यात आले आहे. ज्यामध्ये कनिष्ठ पदावर वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे कारण काय ? असा कर्मचारी संघंटनेने प्रश्न उपस्थित केले आहे.

वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून कनिष्ठ दर्जाच्या संवर्गाचे कामकाज करणे योग्य आहे का? याच न्यायाने परिवहन आयुक्त कार्यालयात रिक्त असलेल्या कार्यासन अधिकारी या पदाचे कामकाज सहायक परिवहन आयुक्त यांचेकडे भविष्यात सोपविण्यात येईल. असे झाल्यास कर्मचारी वर्गावर अन्याय होईल. त्यामुळे आपण तात्काळ वरील आदेश रद्द करावा. अन्यथा, त्याचे परिणाम येणाऱ्या काळात उग्ररुप धारण करतील. असा इशारा मोटार वाहन कर्मचारी संघंटनेचे अद्यक्ष शंकर किरडे यांनी दिला आहे.

कर्मचारी संघंटनेने उपस्थित केलेले प्रश्न

- सहायक परिवहन आयुक्त पद एस-१६ या वेतन श्रेणीमधील असून प्रशासकीय अधिकारी पद हे एस-१५ या वेतन श्रेणीमधील आहे.

- वरिष्ठ वेतन श्रेणीमधील अधिकाऱ्यांनी निम्न श्रेणीमधील पदाचे कामकाज करणे शासन धोरणाशी सुसंगत नाही.

- प्रशासकीय अधिकारी लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांमधून पदोन्नतीने भरले जाणारे सर्वोच्च पद आहे.

- प्रशासकीय अधिकारी लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या सेवाजेष्ठतानुसार भरणे अपेक्षीत

- पदासाठी आवश्यक अर्हता प्राप्त केलेले वरिष्ठ कर्मचारी उपलब्ध असूनही प्रशासकीय अधिकारी पद भरण्यास टाळाटाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.