Bhiwandi News: भिवंडी दगडफेक प्रकरण; पोलीस उपायुक्तांची बदली, तणाव योग्य पद्धतीने न हाताळल्याचा आरोप

Bhiwandi News: भिवंडीत गणपती विसर्जन मिरवणुकीत झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर पोलीस उपायुक्त (डीसीपी) श्रीकांत परोपकरी यांची तत्काळ प्रभावाने बदली करण्यात आली आहे.
Bhiwandi stone pelting case
Bhiwandi stone pelting caseESakal
Updated on

ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी गुरूवारी झोन-2 चे पोलीस उपायुक्त (डीसीपी) डॉ. श्रीकांत परोपकरी यांची भिवंडीतील जातीय तणाव योग्य पद्धतीने हाताळली नसल्याबद्दल त्यांची बदली केली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आयुक्तांनी परोपकरी यांच्या जागी मोहन दहीकर यांची नियुक्ती केली आहे.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन मिरवणुकीत गणेश मूर्तीवर दगडफेक झाल्याच्या अफवेवरून ठाणे जिल्ह्यातील भिवंडीत वाढलेला तणाव नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आणि जातीय घटनांवर तीन गुन्हे दाखल केले. पोलीस विभागाच्या उच्च पदस्थांचा असा विश्वास आहे की परिस्थिती वाढू नये म्हणून परोपकरी त्वरित आणि कठोर कारवाई करण्यात अयशस्वी ठरले.

Bhiwandi stone pelting case
Dombivali Crime : पुण्यात हत्या करून बिहारला पळून जाण्याआधीच हाती बेड्या

यापूर्वी गणेशमूर्तींची तोडफोड करणाऱ्यांवर कारवाई होत नसल्याचा आरोपही स्थानिक रहिवासी या परिसरातील पोलीस अधिकाऱ्यांवर करत आहेत. ईद-ए-मिलादनिमित्त बुधवारी निघालेल्या मिरवणुकांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी अतिरिक्त फौजफाटा भिवंडीत तैनात केला होता. मंगळवारी, हिंदुस्थानी मशिदीजवळून सुरू झालेल्या गणपती विसर्जन मिरवणुकीत बाचाबाची आणि हाणामारी झाल्याचे माहिती समोर आली आहे.

भिवंडीत बुधवारी सायंकाळी एका ऑटो रिक्षा आणि मोटारसायकलसह दोन वाहनांची अज्ञातांनी तोडफोड केली. ही घटना भिवंडीतील शिवाजी चौकात घडली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. भिवंडीतील शिवाजी चौक परिसराला नाकाबंदी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. काही दुकानदारांनी आपली दुकाने बंद केली. या प्रकारात सहभागी असलेल्या कुख्यातांवरही पोलिसांनी करडी नजर ठेवली होती. बुधवारी रात्री गणपती विसर्जनाच्या वेळी तीन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. भिवंडीतील वंजारपट्टी नाक्यावर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने काही लोक जखमी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.