Thane Crime : भरारी पथकातील कर्मचाऱ्यांची कर्तव्यात कसूर; निलंबनासह गुन्हा दाखल

निवडणूक कर्तव्यात कसूर केल्याने निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांच्याद्वारे ८ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
police suspended
police suspendedsakal
Updated on

ठाणे - उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातील भरारी पथक क्र. 3 व 6 मधील उल्हासनगर महानगरपालिकेचे कर्मचारी लिपिक संकेत चनपूर, संदीप शिरसवाल व मुकादम, आण्णासाहेब बोरूडे तसेच या पथकातील पोलीस कर्मचारी पोलीस हवालदार विश्वनाथ ठाकूर आणि पोलीस नाईक राजरत्न बुकटे यांच्यावर निवडणूक कर्तव्यात कसूर केल्याने निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांच्याद्वारे ८ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्यावर तातडीने निलंबनाचीही कारवाई करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.