msrtc
msrtc

Coronavirus : एवढं सगळं करुनही राज्यातील 'एसटी' कर्मचारी वाऱ्यावर

Published on

मुंबई : आंतरराज्य व राज्याच्या सीमेपर्यंत मजूर विद्यार्थी यांची वाहतूक सुरू आहे. या वाहतूक दरम्यान कर्मचाऱ्यांना आवश्यक वैद्यकीय सुविधा सुरक्षा साधने पुरेशा प्रमाणात देण्यात आलेल्या नाहीत. कर्मचाऱ्यांना राहण्याची सोय, जेवणाच्या सुविधा अपुऱ्या आहेत. परिणामी अत्यावश्यक सेवेत कर्तव्य बाजावणार्या एसटी कर्मचाऱ्यांना 50 लाखांचे विमा कवच देण्याची मागणी एसटी महामंडळाचे प्रभारी व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांना पत्र पाठवून करण्यात आली आहे. 

शासनाने अटी व शर्तीच्या अधीन राहून रेड झोन वगळता एसटीची वाहतूक सुरू करण्यास जिल्हा अंतर्गत परवानगी दिली आहे. मात्र वाहतूक करताना दिलेल्या अटी व शर्ती चे पालन अनेक ठिकाणी करण्यात येत नसून, शासकीय सुचनांची पायमल्ली संबंधीत प्रशासनाकडून होत आहे. कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियमीत व परिपूर्ण वैद्यकीय तपासणी केली जात नाही, शिवाय त्यांना 50 लाखाचे विमा कवचही नाही. 

एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही विभागात रेड झोन मधून कामगिरी करून आलेल्या  कर्मचाऱ्यांना थेट घरी पाठवण्यात येते. त्यामुळे कर्मचारी बाधित असल्यास त्याच्या कुटुंबाला सुद्धा त्याचा धोका निर्माण होत आहे. त्यामुळे रेड झोन व कंटेंनमेंट झोन मध्ये काम करणा-या किंवा काम करून आलेल्या एसटी कर्मचा-यांची स्वॅब टेस्ट होणे आवश्यकच असल्याची मागणी सुद्धा राज्य एसटी कामगार संघटनेचे अद्यक्ष संदीप शिंदे यांनी केली आहे.

Despite all this, the health security of ST employees in the state is in jeopardy

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.