मुंबई: विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना हमीभाव, कर्जमाफी आणि अन्य आश्वासनांचा सर्वच पक्षांकडून भडिमार केला जात असला, तरी मागील नऊ महिन्यांत तब्बल १९३३ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून जीवन संपवले आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नांना हात घालण्याऐवजी टाळ्याखाऊ भाषणे करण्यात धन्यता मानली जात आहे.