महाविकास आघाडी सरकार असलं तरीही, निवडणुकीसाठीही मुंबईतील सर्व 227 वॉर्ड्समध्ये काँग्रेस करणार काम

महाविकास आघाडी सरकार असलं तरीही, निवडणुकीसाठीही मुंबईतील सर्व 227 वॉर्ड्समध्ये काँग्रेस करणार काम
Updated on

मुंबई, ता. 25: महाराष्ट्रात तीन पक्षाच्या  महाविकास आघाडीचे सरकार आहे. असे असले, तरी आगामी  महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेस अध्यक्ष म्हणून आम्हाला मुंबईतील 227 वॉर्डमध्ये काँग्रेसचे काम करायचे आहे. तसेच  निवडणुकीची तयारीसुद्धा आम्हाला 227 वॉर्डसाठीच करायची आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या माध्यमातून मुंबईतील 227 वॉर्डमधील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहचून त्यांना प्रेरणा देण्याचे काम आम्हाला करायचे आहे आणि तेच आमचे लक्ष्य आहे, असे प्रतिपादन मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी आज केले.  मुंबई काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष भाई जगताप व मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांनी आज  थोर महापुरुषांच्या मुंबईतील स्मृतिस्थळांना भेट देऊन त्यांना पुष्पांजली अर्पण केली. त्यावेळी ते बोलत होते.

भाई जगताप आणि चरणसिंग सप्रा यांनी मुंबईतील मंत्रालयाजवळील  महात्मा गांधी तसेच पंडित जवाहरलाल नेहरू यांचा पुतळा, ओव्हल मैदान येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, रिगल सिनेमा जवळील लालबहादूर शास्त्री यांचा पुतळा, कफ परेड येथील राजीव गांधी यांचा पुतळा, हुतात्मा चौक येथील हुतात्म्यांचे स्मृतिस्थळ, फोर्ट येथील दादाभाई नौरोजी यांचा पुतळा, गिरगाव मधील लोकमान्य टिळक यांचा पुतळा, वरळी येथील वल्लभभाई पटेल यांचा पुतळा, तसेच चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मृतिस्थळ, शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतिस्थळ यांना भेट देऊन पुष्पांजली अर्पण केली व अभिवादन केले. तसेच मुंबईतील प्रभादेवी येथील सिद्धिविनायक व माहीम दर्ग्यातील मगदूम शाह बाबांचे दर्शन घेतले. तसेच माहीम चर्चला भेट देऊन तेथे आशीर्वाद घेतले. 

यानिमित्ताने बोलताना भाई जगताप पुढे म्हणाले की, थोर महापुरुषांच्या स्मृतिस्थळावर जेव्हा आपण नतमस्तक होतो व त्यांना अभिवादन करतो, तेव्हा त्यांच्याकडून आपल्याला नेहमीच प्रेरणा मिळते. नवी ऊर्जा मिळते. मुंबई काँग्रेस अध्यक्ष म्हणून कामाची नव्या जोमाने सुरुवात करताना हीच प्रेरणा व ऊर्जा आपल्या कामी येईल. मुंबईतील काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांपर्यंत हीच प्रेरणा व ऊर्जा मला पोहचवायची आहे. 

या स्मृतिस्थळांना भेट देऊन त्यांना अभिवादन करण्याच्या कार्यक्रमात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप व मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांच्या सोबत, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस संदेश कोंडविलकर व भूषण पाटील, मुंबई काँग्रेसचे अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष कचरू यादव, मुंबई काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील नरसाळे, हुकुमराज मेहता, मुंबई काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Despite of Maha Vikas Aghadi government Congress party will work in all 227 wards in Mumbai

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.