सागरी सीमा स्त्रीशक्तीच्या हाती ! 'इंफाल' युद्धनौका नौदलात दाखल, स्टिल्थ असण्यासोबत 'ही' आहे खासियत

सागरी सीमा स्त्रीशक्तीच्या हाती ! 'इंफाल' युद्धनौका नौदलात दाखल, स्टिल्थ असण्यासोबत 'ही' आहे खासियत

इंफाल'' स्टिस्थ युध्दनौका नौसेनेच्या ताफ्यात तैनात
Published on

Imphal Destroyer Commissioned in Navy: माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल)ने ‘इंफाल’ ही स्टिस्थ युद्धनौका नौसेनेकडे सुपूर्द केली. रडारपासून वाचवण्यात सक्षम असलेली ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्‍ज युद्धनौका निर्धारित वेळेच्या चार महिन्यांपूर्वीच बांधून तयार झाली. विशेष म्‍हणजे या युद्धनौकैवर महिला अधिकारी असणार आहे. इंफालच्या समावेशामुळे हिंद महासागरात नौसेनेची क्षमता वाढणार आहे.
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल)चे संचालक संजीव सिंघल आणि रिअर ॲडमिरल संजय साधू यांनी या युद्धनौकेच्‍या करारावर हस्ताक्षर केले. स्वदेशी युद्धनौका इंफाल एक कंबाइंड गॅस एंड गॅस (सीओजीएजी) प्रपल्शन सेटद्वारे संचालित होते. यामध्ये चार गॅस टर्बार्इन आहेत. ही युद्धनौका ५६ किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने धावते.

असे झाले काम
१९ मे २०१७ मध्ये या युद्धनौकेची निर्मिती सुरू झाली आहे. २० एप्रिल २०१९ मध्ये पहिल्यांदा समुद्रात उतरवण्यात आले होते. २८ एप्रिल २०२३ मध्ये पहिल्या समुद्र परीक्षणासाठी रवाना झाली. आतापर्यंत अनेक चाचण्यांतून युद्धनौका गेली आहे. केवळ सहा महिन्यांत ही नौका नौसेनेला सोपवण्यात आली आहे.

स्वदेशी साहित्याचा वापर
इंफालच्या निर्मितीत ७५ टक्के स्वदेशी साहित्य वापरण्यात आले आहे. यामध्ये दोन्ही क्षेपणास्त्रांची निर्मिती भारतात झाली आहे. स्वदेशी टॉरपीडो ट्यूब लॉन्चर आणि पानबुडी रोधक रॉकेट लॉन्चर हे दोन्ही लार्सन ॲण्ड टुब्रोने तयार केली आहे. ७६ मिलीमीटर सुपर रॅपिड गन माऊंट ही बीएचईएल, हरिद्वारमध्ये तयार झाली आहे.

वैशिष्ट्ये
युद्धनौकेच्या बांधणीत स्वदेशी स्टील डीएमआर २४९ ए चा वापर
देशातील सर्वांत मोठी युद्धनौका
लांबी १६४ मीटर आणि विस्थापन क्षमता ७५०० टनापेक्षा अधिक
युद्धनौकेवरचे प्लॅटफॉर्म सर्व प्रकारचे मिशन पूर्ण करण्यासाठी सक्षम
ब्रह्मोस आणि बराक ८ क्षेपणास्त्राने सज्ज
पाण्याच्या आतमध्ये युद्ध करण्यासाठी सक्षम (Latest Marathi News)

सागरी सीमा स्त्रीशक्तीच्या हाती ! 'इंफाल' युद्धनौका नौदलात दाखल, स्टिल्थ असण्यासोबत 'ही' आहे खासियत
Sharad Pawar : सुनील तटकरेंचे मोठे बंधू सुप्रिया सुळेंच्या भेटीला; भेटीचं नेमकं कारण काय?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.