पायाची हतबलता हातावर पेलणारा बिल्डर; पाहा प्रेरणादायी VIDEO

Dev Mishra who lost his both legs in train accident became a body builder
Dev Mishra who lost his both legs in train accident became a body builder esakal
Updated on

बिहार (Bihar) सारख्या तसेही गरीब म्हणून हिणवल्या जाणाऱ्या राज्यातील बेगुसराय जिल्ह्यातील वेल्डिंगचं काम करणाऱ्या देव मिश्रा या युवकाची ही गोष्ट आहे. देव मिश्राचं (Dev Mishra) आयुष्य तसही सर्वसाधारण पद्धतीने सुरू होतं. तो एका बांधकाम व्यावसायिकाकडं वेल्डर म्हणून कामाला होता. त्याला कामासाठी प्रवास करावा लागायचा. वेल्डिंगचं काम करणारा देव हा सहसा रेल्वेनेच प्रवास करायचा. 2015 ला तो असाच रेल्वेने हैदराबादला जाण्यासाठी बरौली स्टेशनवर आला. मात्र ट्रेनमध्ये चढताना तो गर्दीतील धक्काबुक्कीमुळे रेल्वे रूळावर पडला. यायचवेळी त्या रूळावरून दुसरी ट्रेन जात होती. ही ट्रेन देव मिश्राच्या पायवरूनच गेली. तो वेदनेने कळवळला. या दुर्घटनेनंतर (Train Accident) देवला रूग्णालयात दाखल करण्यात आले.

Dev Mishra who lost his both legs in train accident became a body builder
VIDEO : कॅरेबियन छोरीचा अफलातून कॅच; जॉन्टीही होईल आवाक्

हातावरचे पोट असणाऱ्या देवला तब्बल 1 महिना रूग्णालयात अंथरूणाला खिळून रहावे लागले. देववर आलले संकट इथंपर्यंतच थांबले नाही. त्याला नंतर आपले दोन्ही पाय गमवावे (Lost Both legs) लागले तेही कमरेपासून. या अपघातामुळे त्याला कोणतेच काम करता येईना. जर देवने कमवले नाही तर त्याच्या घरची चूल पेटणार नव्हती. त्यातच देवने दोन्ही पाय गमावले होते. काम करण्यासाठी देवने कृत्रिम पाय लावून घेण्यासाठी जयपूर गाठले. मात्र डॉक्टरांनी त्याची निराशा केली. त्याचा पाय गुडघ्याच्या वरून काढावा लागला असल्याने जयपूर फूट त्याला बसवता येणार नव्हते. त्यामुळे आता त्याला पायाविनाच आपले आयुष्य काढावे लागणार होते.

Dev Mishra who lost his both legs in train accident became a body builder
ICC Test Rankings : झुकेगा नहीं; टीम इंडियातील 'पुष्पा'चा जलवा!

मात्र देवने हिम्मत हारली नाही. वेल्डिंग करून लोखंडाला आकार देणारे तगडे हात त्याच्याकडे होते. या हातावरच तो आपली हालचाल करत होता. आता तो या हाताच्या जोरावर व्यायामही करू लागला होता. यावेळी त्याच्या डोक्यात मुंबई (Mumbai) गाठण्याची कल्पना आली. एक दिवस त्याने मुंबईचे तिकिट काढले. ज्यांना संघर्ष करता येतो त्यांना ही मायानगरी नक्कीच काही ना काही देत असते. देव कुर्ला स्टेशनच्या बाहेर राहू लागला. लोक त्याला एक दिव्यांग म्हणून खाण्यासाठी काहीतरी देत होते. मात्र कधी कधी त्याला उपाशी पोटी झोपावे लागत होते. त्याने अनेक लोकांकडे काम मागितले मात्र दोन्ही पाय गमावलेल्या देवला कोणी काम देऊ शकले नाही. देव कार्टर रोडच्या फुटपाथवर झोपायचा. तेथे तो आपल्या हाताच्या जोरावर कर्तबगारी करत पैसा कमवू लागला. मात्र तो पैसा फार तुटपूंजा होता.

मात्र देव मिश्राला आपल्या टॅलेंटवर खूप विश्वास होता. त्याने सेलिब्रेटी लोकांची भेट घेण्यास सुरूवात केली. तो बांद्रा आणि जुहूमध्ये सेलिब्रेटिंच्या बंगल्यासमोर उभे राहून कर्तब करू लागला. एकेदिवशी जॉकी श्रॉफने देव मिश्राची भेट घेतली त्याचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्याला 5000 रूपये दिले. योगायोगाने त्याची भेट ज्वेलरी डिझायनर फराह खानशी झाली. त्यांनी देवच्या कर्तबगारीवर खूष होऊन त्याला ट्रायसिकर विकत घेऊन दिली. त्याचे राहण्या खाण्याची सोय देखील केली. फराहने देवला जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत त्याला काळजी करण्याची गरज नाही असे सांगितले.

Dev Mishra who lost his both legs in train accident became a body builder
Video: पाकमध्ये वॉर्नरचे नखरे; कोहलीचं 'मार्केट' होणार डाऊन?

यानंतर त्याने डांसिंगमध्ये आपला हात आजमावला त्याला तेथे यशही मिळाले. त्याने इंडिया गॉट टॅलेंटमध्येही (India Got Talent) सहभाग घेतला. त्यानंतर तो संपूर्ण भारताला माहिती झाला. आता त्याने बॉडी बिल्डिंगकडेही आपला मोर्चा वळवला असून नकतेच त्याला परळ श्री चा खिताब देखील मिळाला आहे. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.