Devendra Fadanvis: विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीसच असणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, भाजपच्या 'या' नेत्याने केला दावा

Kripashankar Singh in Ulhasnagar News: या विधानाने शिवसेनेत नाराजगीचा सूर उमटू लागला आहे.
Assembly Elections
Devendra Fadanvisesakal
Updated on

Latest Ulhasngar News: भाजपा नेते कृपाशंकर सिंग यांनी डि.सी.एम या अर्थाला कलाटणी दिली आहे.डी म्हणजेच देवेंद्र आणि सी.एम चा अर्थ समजून घ्या.असे स्पष्ट करताना येत्या विधानसभा निवडणूकीनंतर भाजप प्रणित महायुतीचे सरकार येणार असून राज्यात देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील असे विधान भाजप नेते आणि विधानसभेचे निरीक्षक कृपाशंकर सिंग यांनी उल्हासनगरात काढले.या विधानाने शिवसेनेत नाराजगीचा सूर उमटू लागला आहे.

Assembly Elections
Devendra Fadanvis Dhule Daura: काँग्रेसद्वयींनी 50 वर्षांत पाणी अडविले का? फडणवीसांचा शिंदखेड्यातील शेतकऱ्यांना आव्हानात्मक सवाल

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निरीक्षक म्हणून कृपाशंकर सिंह हे काम पाहत आहेत. कृपाशंकर सिंग यांच्या देखरेखीखाली पक्षांतर्गत मतदानाच्या माध्यमातून उमेदवार निवडीची प्रक्रिया केली गेली.यावेळी भाजपच्या जिल्हा कमिटीसह विविध सेलच्या पदाधिकारी तथा माजी नगरसेवकांनी मतदान केले.

जवळपास अडीचशे पेक्षा अधिक भाजप सदस्यांनी आपले मत मांडले.विशेष म्हणजे अशा प्रकारची निवड प्रक्रिया ही भाजपकडून पहिल्यांदाच केली जात आहे.यावेळी देण्यात आलेल्या मतपत्रिकेत तीन जणांची नावे एक,दोन,तीन या क्रमाने नमूद करण्यात आली आहेत.यावेळी आमदार कुमार आयलानी, जिल्हाध्यक्ष प्रदिप रामचंदानी,जमनु पुरस्वानी,प्रकाश माखिजा,राजेश वधारिया,राजू जग्यासी,दिपक छतलानी,अमीत वाधवा,सुनील राणा,कपिल अडसूळ,काजल मूलचंदानी आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Assembly Elections
Devendra Fadanvis Dhule Daura: फडणवीसांनी चितारला धुळे जिल्ह्याचा विकास! आ. रावल, डॉ. भामरे आधुनिक भगीरथ; आ. पटेल जलनायक

मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मतपत्रिका एका लखोट्यात बंद करून कृपाशंकर सिंह हे सोबत घेऊन गेले.ते जात असताना पत्रकारांनी त्यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीबाबत विचारले असता त्यांनी मोठे विधान केले. यंदा महायुतीच्या सरकारमध्ये शिवसेनेचे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतानाही येणारी निवडणूक ही त्यांच्या नेतृत्वात लढवली जाणार नाही हे दर्शवण्याचा त्यांचा मानस दिसून आला.

त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील असे सांगितले.त्यांच्या या विधानामुळे उल्हासनगर मधील शिवसेना नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.कृपाशंकर सिंह हे नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले आहेत.त्यांना

Assembly Elections
Devendra Fadanvis : नार-पार योजना निविदा प्रक्रियेस मंत्रिमंडळाची लवकरच मान्यता : फडणवीस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.