ठाणे - नाशिक, मुंबई आणि नवी मुंबईतील महत्वाच्या विकास प्रकल्पांच्या पायाभरणीसह उद्घाटन कार्यक्रमांसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दाखल झाले आहेत. त्यातच ठाणे- ऐरोली दरम्यान दिघा रेल्वे स्टेशन मधून शुक्रवारी लोकल धावण्यास सज्ज झाली असून त्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
मात्र, या सोहळ्याचे निमंत्रण ठाणे लोकसभा मतदार संघाचे खासदार राजन विचारे यांना आयत्या वेळेस पाठविण्यात आले असले तर, त्या पत्रिकेत त्यांचे नाव वगळण्यात आले आहे. यावरून संतप्त झालेल्या उबाठा गटाचे खासदार राजन विचारे यांनी हा कार्यक्रम पक्षाचा आहे की शासनाचा असा प्रश्न उपस्थित करत केंद्र व राज्य सरकार आणि रेल्वे शासनाची विकृती असल्याची खोचट टीका केली.
ठाणे लोकसभा मतदार संघ हा बेलापूर ते मीरा भाईंदर पर्यंत मोडत आहे. या मतदार संघाचे खासदार राजन विचारे आहेत. खासदार विचारे यांच्या मतदार संघातील व त्यांच्या प्रयत्नाने ठाणे - ऐरोली दरम्यान उभारलेल्या दिघा गाव रेल्वे स्थानक उभारण्यात आले आहे. त्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी नाशिक, मुंबई आणि नवी मुंबईच्या दौऱ्यावर आले आहे.
यावेळी ठाणे- ऐरोली दरम्यान दिघा रेल्वे स्टेशन मधून शुक्रवारी लोकल धावण्यास सज्ज झाली असून, त्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. मात्र, या सोहळ्याची निमंत्रण पत्रिका काही तासांपूर्वी उबाठा गटाचे खासदार राजन विचारे यांना पाठवण्यात आली.
या कार्यक्रमाच्या पत्रिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत निमंत्रित करण्यात आलेल्या सदस्यांमध्ये राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, नारायण राणे, अश्विनी वैष्णव, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, रामदास आठवले, कपिल पाटील, उपमुख्यमंत्री डॉ. देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मंत्र्यांमध्ये दीपक केसरकर, उदय सामंत, रवींद्र चव्हाण, शंभूराज देसाई, मंगलप्रभात लोढा, आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, श्रीरंग बारणे यांच्या नावांचा समावेश आहे.
मात्र ज्यांच्या मतदारसंघात हा कार्यक्रम होत आहे, ते खासदार राजन विचारे यांचेच नाव लोकार्पण कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत त्यांचेच नाव वगळण्यात आले. यावर संतप्त झालेल्या खासदार राजन विचारे यांनी त्याचा चांगलाच समाचार घेत, टीकेची झोड उठवली आहे. लोकशाहीला काळीमा फासणाऱ्या सरकारला २०२४ मध्ये येणाऱ्या आगामी सर्व सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जनता यांची जागा दाखवून देईल.
लोकप्रतिनिधीची नावे वगळून इतर नावे टाकण्याचा कळस या सरकारने केल्याचे ही विचारे यांनी म्हटले आहे. तसेच दिघा स्टेशनसाठी खासदार राजन विचारे यांनी सातत्याने पाठवपुरवा करून प्रकल्प कार्यान्वित केला आहे. आता त्याचे लोकार्पण होत असताना स्थानिक खासदार म्हणून निमंत्रण देण्याची प्रथा आहे. मात्र निमंत्रण पत्रिकेत नाव टाकले गेले नसून आजचा कार्यक्रम पक्षाचा आहे की शासनाचा असाच प्रश्न उपस्थित होत आहे. असे ही त्यांनी म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.