Mumbai : विशेष पोलिस आयुक्त सीपींवर भारी पडणार? 'इथं कोणीच सिंघम नाही' ट्विटची चर्चा

deven bharti first special cp of mumbai police tweet Mumbai Police is a Team Singhams don’t exist
deven bharti first special cp of mumbai police tweet Mumbai Police is a Team Singhams don’t exist
Updated on

महाराष्ट्र सरकारने वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि अतिरिक्त पोलिस महासंचालक देवेन भारती (Deven Bharati) यांची मुंबईचे पहिलेच विशेष पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे.

देवेन भारती हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू अधिकारी म्हणून ओळखले जातात. देवेन भारती यांनी आजपासून पदभार स्वीकारला असून पदभार स्विकारताच देवेन भारती यांनी केलेल्या सूचक ट्विटची चर्चा होत आहे.

देवेन भारती यांनी मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच ट्विट करत सूचक इशारा दिला आहे. मुंबई पोलीस दल ही एक टीम आहे. इथं कोणीही सिंघम नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. हे ट्विट मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर (vivek phansalkar) यांना उद्देशून असल्याचे बोलले जात आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात महाविकास आघाडीतर्फे मोर्चा काढण्यात आला होता. त्या दिवशी मुंबई पोलिस कमिश्नर विवेक फणसाळकर यांच्या मुलीचे लग्न देखील होते. तरी देखील ते त्या दिवशीच्या पोलिस बंदोबस्तासाठी हजर होते.

याचा संदर्भ देत एक व्हिडीओ बनवण्यात आला होता, ज्याला सिंघम गाण्याचे संगित देण्यात आलं होतं आणि विवेक फणसळकर यांना सिंघम दाखवण्यात आले होते.

यानंतर आज मुंबईचे पहिले विशेष पोलिस आयुक्त म्हणून पदभार स्विकारताच देवेन भारती यांनी ट्वीट केलं आहे. त्यांनी म्हटलं की, "मुंबई पोलिस एक टीम आहे आणि इथं कोणीही सिंघम नाही" असे ट्वीट केले आहे. हे ट्विट फणसाळकर यांच्या त्या व्हिडीओला उद्देशून असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा - ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

deven bharti first special cp of mumbai police tweet Mumbai Police is a Team Singhams don’t exist
Sammed Shikharji : वादग्रस्त प्रकरणावर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले; जैन धर्मियांना दिला पाठिंबा

मुंबई पोलिसांमध्ये विशेष आयुक्त (स्पेशल सीपी) हे पद निर्माण करण्यात आले आहे. आयपीएस देवेन भारती यांना या पदावर पहिली नियुक्ती मिळाली आहे. अशाप्रकारे देवेन भारती यांना मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त बनण्याचा मान मिळाला. दरम्यान मुंबई पोलिसांच्या इतिहासात प्रथमच हे पद निर्माण करण्यात आले आहे. या संदर्भात गृह विभागाने आदेश जारी केले आहेत. मुंबईतील सर्व पाचही सहआयुक्तांच्या कामावर नियंत्रण आणि देखरेख ठेवण्याची जबाबदारी या नव्या विशेष आयुक्तांकडे देण्यात आली आहे.

deven bharti first special cp of mumbai police tweet Mumbai Police is a Team Singhams don’t exist
Mumbai News : IPS देवेन भारती यांची मुंबईच्या विशेष पोलिस आयुक्तपदी नियुक्ती

देवेन भारती फडणवीसांचे विश्वासू

1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले भारती हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. फडणवीस यांच्या 2014 ते 2019 या काळात मुख्यमंत्री असताना भारती हे सह पोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) होते.

यानंतर त्यांना दहशतवादविरोधी पथकाच्या अतिरिक्त महासंचालकपदी बढती देण्यात आली. 2019 मध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर भारती यांची ताकद कमी झाली होती. त्यांना राज्य सुरक्षा महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.