स्वतःला 'गांधी' समजण्याची घोडचूक अजिबात करू नका - देवेंद्र फडणवीस

स्वतःला 'गांधी' समजण्याची घोडचूक अजिबात करू नका - देवेंद्र फडणवीस
Updated on

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपल्या जीवनाची आहुती मातृभूमीसाठी दिली. सर्वस्व अर्पण केले. त्यांच्याबद्दल अशी भाषा वापरणे, हा देशासाठी परमोच्च त्याग करणाऱ्या तमाम देशभक्तांचा अवमान आहे. त्यामुळे आता आणखी एका विधानासाठी राहुल गांधी यांनी संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे. अशी मागणी महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय.   

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत केलेल्या विधानावरून माफी मागण्यास नकार देणाऱ्या राहुल गांधींवर महाराष्ट्राचे विरोधीपक्ष नेते  आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे.

राहुल गांधी हे सावरकरांच्या नखाचीसुद्धा बरोबरी करू शकत नाहीत. स्वतःला 'गांधी' समजण्याची घोडचूक तर त्यांनी अजिबात करू नये! केवळ आडनाव गांधी असल्याने कुणी 'गांधी' होत नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना लगावला आहे.

नागरिकत्व सुधारणा विधेयकाचे (Citizenship कायद्यात रुपांतर झाल्यानंतर काँग्रेसने आता मोदी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. दिल्लीत आज रामलीला मैदानावर काँग्रेसकडून ‘भारत बचाव रॅली’चे आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीमध्ये राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते सहभागी झालेत. या रॅलीत बोलताना राहुल गांधींनी भाजपवर आणि पंतप्रधान मोदींवर जोरदार टीकास्त्र सोडलंय.

'रेप इन इंडिया' या विधानावरून राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपकडून करण्यात येतेय. अशात काँग्रेस नेते राहुल गांधींनी भाजपवर टीका करताना एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. भाजपचे नेते माझ्याकडून माफीची मागणी करत आहेत. पण, माफी मागायला मी राहुल सावरकर नाही तर गांधी आहे असं म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय. देशात जी परिस्थिती आहे त्याला मोदीच जबाबदार आहेत. त्यांनी अर्थव्यवस्थेसह कायदा सुव्यवस्थेचीही वाट लावली. असा थेट आरोप राहुल गांधींनी केलाय. 

राहुल गांधी यांच्यावर संजय राऊतांची टीका  

राहुल गांधी यांनी विनायक दामोदर सावरकरांवर केलेल्या टीकेला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून टोला लागावालाय. आम्ही पंडित नेहरू, महात्मा गांधी यांना मानतो तुम्ही वीर सावरकरांचा अपमान करू नका. असं संजय राऊत यांनी सुनावलंय.

Webtitle : devendra fadanavis targets narendra modi on his controversial statement about savarkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.