देवेंद्र फडणवीस उद्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार

देवेंद्र फडणवीस उद्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
Updated on

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या पदाचा राजीनामा देतील. विद्यमान विधानसभेचा कालावधी उद्या संपतोय. त्यामुळे तांत्रिक बाब म्हणून फडणवीस यांना राजीनामा द्यावा लागेल. राज्यात अजूनही सत्तास्थापनेचा पेच कायम आहे.

राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय. सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर दगा फटका टाळण्यासाठी सगळ्याच पक्षांकडून दक्षता घेतली जातंय. शिवसेनेनं आपल्या सर्व आमदारांना रंगशारदा हॉटेलमध्ये ठेवलंय. तर भाजपचे सर्व आमदार मुंबईत दाखल होतातय. दुसरीकडे, काँग्रेसच्या आमदारांनी पक्षाकडून मुंबईला तातडीने पोहचण्याचे आदेश देण्यात आलेत. काँग्रेस आमदारांची उद्या मुंबईत बैठक होतं आहे.   

राष्ट्रपती राजवट लागण्याआधी महाराष्ट्रात 'हे' होणार

निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या पक्षाला राज्यपाल सत्तास्थापनेसाठी निमंत्रण देतात, निवडणूकपूर्व युतीने सत्तास्थापनेचा दावा केला नसेल तर जास्त आमदारसंख्या असलेल्या पक्षाला सरकार तयार करण्यासाठी बोलावले जाईल असे प्रतिपादन ज्येष्ठ विधीज्ञ ,माजी महाधिवक्‍ता ऍड श्रीहरी अणे यांनी केले आहे. सकाळशी बोलताना ते म्हणाले, "निवडणुकीनंतर सत्तास्थापनेचा दावा करण्यास कुणीही पुढे आले नाही तर राज्यपाल सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या पक्षाला निमंत्रण देतात. यासंबंधातील तरतुदी स्पष्ट आहेत.

भाजप स्थापन करणार अल्पमतातील सरकार

8 तारखेला महाराष्ट्रातील सरकारचा कार्यकाळ संपतोय. त्यानंतर, महाराष्ट्र राष्ट्रपती राजवटीकडे वाटचाल करेल अशी देखील शक्यता वर्तवली जातेय. दरम्यान, त्या आधी भाजप अल्पमतातील सरकार स्थापन करणार असल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळतेय. मात्र, असं झाल्यास आणि शिवसेनेची ताठर भूमिका तशीच राहिल्यास हे सरकार किती दिवस तग धरणार हा गुलदस्त्यातील प्रश्न आहे. 

Webtitle : devendra fadanavis will resign as cm of maharashtra

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.