फोन टॅपिंग लीक प्रकरणाबाबत फडणवीसांचा जबाब महत्वाचा

पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुराव्याची मागणी केली होती.
Devendra Fadanvis
Devendra Fadanvis
Updated on
Summary

पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुराव्याची मागणी केली होती.

मुंबई - मागील काही दिवसांपूर्वी वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याची बदली प्रकरण आणि फोन टॅपिंग लीक प्रकरणाबाबत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत अनेक गौप्य स्फोट केले होते. दरम्यान, ही गोपनीय माहिती लिक झाल्याप्रकरणी सायबर पोलिस तपास करत असून पोलिसांनी फडणवीस यांच्याकडे पुराव्याची मागणी केली होती.

Devendra Fadanvis
मंत्र्यांच्या बंगल्यांना वीजबिल सवलत म्हणजे सामान्यांच्या जखमेवर मीठ, भाजपची टीका

या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी हे पुरावे केंद्रीय गृहमंत्रालयाकडे दिले होते. ही कागदपत्रे आणि पेन ड्राइव्ह १० दिवसांत तपासासाठी मुंबई पोलिसांना सोपवण्याचे आदेश न्यायालयाने केंद्रीय गृहमंत्रालयाला दिले होते. न्यायालयाने दिलेल्या मुदतीनंतर एमएचएने न्यायालयाकडे आणखी वेळ मागितला. दरम्यान, आता या प्रकरणात देवेंद्र फडणवीस हे प्रमुख साक्षीदार असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले आहे. तसेच तपासासाठी त्यांचा जबाब नोंदवणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. त्यानुसार आता पुढील कार्यवाही होणार आहे.

दरम्यान, राज्यातील पोलिस दलातील बदल्यांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी ज्या माहितीच्या आधारे केला होता. सायबर विभागाने या फोन टॅपिंग अहवाल लीक प्रकरणात देवेंद्र फडणवीस हे आपले प्रमुख साक्षीदार असल्याची माहिती कोर्टाला दिली आहे. IPS अधिकारी रश्मी शुक्ला ह्या गुप्तचर विभागाच्या प्रमुख असताना राज्यातील पोलिस दलात बदल्यांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याच्या संशयाने काही नेते आणि एजन्ट्सचे फोन टॅप करण्यात आले होते. याचा अहवाल रश्मी शुक्ला यांनी तयार केला होता. पण अहवाल गुप्त असतानाही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी पत्रकार परिषद घेऊन बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. तसेच यासंदर्भातली सर्व कागदपत्रं आपण केंद्रीय गृहमंत्रालयाला देणार असल्याचे जाहीर केले होते.

Devendra Fadanvis
देशात २४ तासात २.४७ लाख नवे रुग्ण; ओमिक्रॉनबाधितांची संख्या ५४८८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.