मुंबई : कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर पुण्यातील कोथरुडमध्ये गोळीबार झाला यानंतर गंभीर अवस्थेत त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. हा गँगवारचा प्रकार असल्याचं समोर आलं आहे. यावर आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. ( Devendra Fadnavis statement on the gun Sharad Mohol firing case at Pune)
गुंडांचा बंदोबस्त शासनाकडून केला जातो
फडणवीस म्हणाले, "कुख्यात गुंडाची हत्या त्याच्याच साथीदारानं केली आहे. कुख्यात गुंड कोणीही असो त्याचा बंदोबस्त या शासनाकडून केला जातो. त्यामुळं अशा प्रकारचं गँगवार करण्याची हिंमत कोणी करणार नाही" (Marathi Tajya Batmya)
मोहोळवर तीन गोळ्या झाडल्या
गोळीबारात गंभीर जखमी झाल्यानंतर पुण्यातील रुग्णालयात उपचारादरम्यान शरद मोहोळचा मृत्यू झाला. आज दुपारी कोथरूडमधील सुतारदरा परिसरात शरद मोहोळ वर गोळीबार करण्यात आला होता. बाईकवरुन हल्लेखोर आले होते, त्यांनी शरद मोहोळवर तीन गोळ्या झाडल्या. (Latest Marathi News)
आव्हाडांवरुन ठाकरेंवर निशाणा
जितेंद्र आव्हाडांच वक्तव्य हे केवळ मुर्खपणाचं वक्तव्य आहे. प्रसिद्धी मिळवण्याकरता बदनाम झालो तरी नाव तर झालं, असं त्यांचं आहे. प्रभू श्रीराम सर्वांचे आहेत, बहुजनांचे, अभिजनांचे, आदिवासी, दलितांचे आहेत, असं कोण आहे की त्यांचे ते नाहीत. उगाचचं ते शाकाहारी, मांसाहारी असल्याचं बोलायचं. विनाकारण भावनांना ठेस पोहोचवण्याचं काम आहे हे. आज आमचे वारकरी, धारकरी, टाळकरी हे सगळे बहुजन समाजाचे आहेत हे सर्वजण प्रभू श्रीरामाला मानतात. मग हा त्यांचा अपमान नाही का? विनाकारण अशांतता निर्माण होईल, असं वागणं चुकीचं आहे.
पण स्वतःला जे हिंदुत्ववादी समजतात असे लोक मात्र यावर मौन साधतात. ते यावर साधा निषेध करायलाही तयार नाहीत. त्याचा साधा निषेधही करायला तयार नाहीत, त्यामुळं हे किती वेगळे लोक आहेत हे सर्वांच्या लक्षात आलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.