दंगल भडकवण्यासाठीच हिंदूंच्या दुकानांची तोडफोड : फडणवीस

पोलीस दलाची जी अवस्था आहे ती सुधारली नाही तर, पोलीस दल सर्वोत्तम राहणार नाही.
देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीसe sakal
Updated on

मुंबई : अमरावतीमध्ये एका दिवसात 40 हजार लोक एकत्र कसे येऊ शकता असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित करत दंगल भडकवायची होती म्हणूनच, जाणीवपूर्वक हिंदूंच्या दुकानांची तोडफोड करण्यात आली, असा आरोप देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. कोविडमध्ये अमरावतीत हजारो लोक रस्त्यावर आले. मात्र, आमच्या मोर्चाला परवानगी देण्यात आली नाही, पण त्या मोर्चाला परवानगी कशी देण्यात आली होती असा सवाल करत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. (Devendra Fadnavis On Amravati Violence )

देवेंद्र फडणवीस
'सोशल मीडियावरील खोट्या माहितीमुळे दंगल', सायबर सेलने बनविली ३६ पोस्टची यादी

अमरावती दंगलीवेळी (Amravati Violence) सोशल मीडियाद्वारे (Wrong News On Social Media ) खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. कोणतंही नियोजन नसताना 40 हजार लोक एकत्र कसे आले असे ते म्हणाले. जाणीवपूर्वक हिंदूंच्या दुकानांची तोडफोड, भाजपच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले असा आरोप फडणवीस यांनी यावेळी केला.

देवेंद्र फडणवीस
वरुण गांधींचा भाजपला पुन्हा घरचा आहेर; आता थेट मोदींवरच निशाणा

पहिल्या दिवशीच्या तोडफोडीचे समर्थन केले नसते तर दुसऱ्या दिवशीची घटना घडली नसती. राज्यातील कायदा सुव्यवस्था भंग करणाऱ्या रझा आकादमीवर कारवाई होणार का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी विचारला. पोलीस दलातील भ्रष्टाचारासंबंधी माहिती देऊनही त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही असेही ते म्हणाले. आज पोलीस दलाची जी अवस्था आहे ती सुधारली नाही तर, पोलीस दल सर्वोत्तम राहणार नाही असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.