Chaityabhoomi Dadar
Chaityabhoomi Dadaresakal

Dhammachakra Pravartan Din : धम्मचक्र प्रवर्तन दिनी चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी, लाखो अनुयायींनी घेतलं दर्शन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी घेतलेल्या धम्म दीक्षेला आज ६७ वर्षे उलटून गेले.
Published on
Summary

सकाळपासून एक लाखांच्या वर नागरिकांनी बाबासाहेबांच्या स्मृतीचे दर्शन घेतले, अशी माहिती चैत्यभूमीचे व्यवस्थापक प्रदीप कांबळे यांनी दिली.

Dhamma Chakra Pravartan Din 2023 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी घेतलेल्या धम्म दीक्षेला आज ६७ वर्षे उलटून गेले. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त काल (ता. २४) दादरच्या चैत्यभूमीवर (Chaityabhoomi Dadar) आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी हजारो अनुयायींनी गर्दी केली होती. त्यांच्या सोयीसाठी पालिका आणि पोलिस प्रशासनाने चोख व्यवस्था केली होती

Chaityabhoomi Dadar
Shivaji Maharaj : राजकोट समुद्रकिनारी उभारण्यात येणार छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा; 'या' दिवशी PM मोदींच्या हस्ते उद्‌घाटन

आंबेडकर यांनी नागपूरला १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लाखो अनुयायींसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. तो दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो. मुख्य कार्यक्रम नागपूरच्या दीक्षाभूमीत होत असला तरी मुंबईच्या चैत्यभूमीत आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने जमतात.

सकाळपासून एक लाखांच्या वर नागरिकांनी बाबासाहेबांच्या स्मृतीचे दर्शन घेतले, अशी माहिती चैत्यभूमीचे व्यवस्थापक प्रदीप कांबळे यांनी दिली. सकाळी ९.१५ वाजता संस्थेच्या अध्यक्षा दर्शनाताई भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.

Chaityabhoomi Dadar
Maratha Reservation : मराठा समाजाचे एवढे आमदार असूनही आरक्षण देत नाहीत, पण आम्ही हे मुद्दाम..; काय म्हणाले अजितदादा?

पुस्तकांना मागणी

चैत्यभूमीवर हजारो अनुयायी जमले होते. त्यामुळे पुस्तकाला मोठी मागणी होती, असे चैत्यभूमीवरील पुस्तक विक्रेते अनिल खैरे यांनी सांगितले. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, भारतीय संविधान व बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या पुस्तकांची चांगली विक्री झाली, असे त्यांनी सांगितले. गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांच्या प्रतिमांचा १०० टक्के खप झाला, असे विक्रेते सूरज शेलार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.