धारावीत कोरोनाचा कहर! परिसरातील रुग्णांची संख्या 500च्या उंबरठ्यावर...

धारावीत कोरोनाचा कहर! परिसरातील रुग्णांची संख्या 500च्या उंबरठ्यावर...
Updated on

मुंबई : धारावीतील कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत असून, केवळ 48 तासांत तब्बल 127 नवे रुग्ण सापडले. त्यामुळे रुग्णांचा आकडा 500 च्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. 

धारावीतील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येताना दिसत नाही. मागील 48 तासांत तब्बल 127 नवे रुग्ण आढळले. त्यापैकी 38 रुग्ण शुक्रवारी, तर 89 रुग्ण शनिवारी सापडले. त्यामुळे धारावीतील रुग्णांची संख्या 496 झाली आहे. रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण मात्र नियंत्रणात असून, मागील तीन दिवसांत एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आतापर्यंत धारावीतील 18 रहिवासी मृत्युमुखी पडले आहेत.

माहीम आणि दादर भागातही 48 तासांत रुग्णांची संख्या वाढली आहे. माहीममध्ये नवे 17 रुग्ण सापडल्याने एकूण बाधितांचा आकडा 53 वर गेला. दादरमध्ये 13 नवे रुग्ण सापडल्याने बाधितांची संख्या 46 झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.