मुंबई: जी उत्तरमध्ये रविवारी 11 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. धारावीमध्ये काल दिवसभरात केवळ 1 नवीन रूग्ण सापडले असून एकूण रूग्णसंख्या 3,620 इतकी झाली आहे. तर 27 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दादरमध्ये काल केवळ 3 नवीन रुग्ण सापडला असून रुग्णांची एकूण संख्या ही 4,446 इतकी झाली आहे. 125 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. माहीममध्ये ही केवळ 7 नवीन रुग्णांची भर पडली असून रुग्णांची संख्या 4,196 इतकी झाली आहे. तर 254 एक्टीव्ह रूग्ण आहेत.
धारावी, दादर, माहिम परिसराचा समावेश असणाऱ्या जी उत्तर विभागात काल 11 नवीन रुग्णांची भर पडली असून रूग्णांचा एकूण आकडा 12,262 वर पोहोचला आहे. तर 406 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जी उत्तरमध्ये आतापर्यंत 619 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. धारावीमध्ये 3,282, दादरमध्ये 4,152 तर माहीममध्ये 3,800 असे एकूण 11,234 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
काल 574 नवे रुग्ण सापडले असून मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 2,69,704 झाली आहे. तर रविवारी 15 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 10,570 वर पोहोचला आहे. काल 586 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 2,45,245 रूग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 91 टक्के इतका झाला आहे. 14 नोव्हेंबरपर्यंत एकूण 16,85,287 कोविड चाचण्या करण्यात आल्या.
मुंबईत काल नोंद झालेल्या 15 मृत्यूंपैकी 11 जणांना दीर्घकालीन आजार होते. रविवारच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 10 पुरुष तर 5 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या 15 रुग्णांपैकी 2 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते तर 13 रुग्णांचे वय 60 वर्षा वर होते.
----------------------------------
(संपादन- पूजा विचारे)
Dharavi only one Covid 19 patient added
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.