धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्याच्या दृष्टीने धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रा.लि.कडून (डीआरपीपीएल) माटुंगा येथील आरपीएफ मैदानावर गुरुवाररी भूमिपूजनाचा कार्यक्रम गुपचूप उरकल्याचा आरोप काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे. गायकवाड यांच्या या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
यापूर्वी 7 तारखेला होणारा हा भूमिपूजनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. कारण धारावी बचाव आंदोलन समितीच्या माध्यमातून स्थानिकांनी माटुंगा लेबर कॅम्प येथे याविरोधाच उपोषण केले होते.
याबाबत डीआरपीपीएलकडे विचारणा केली असता भूमिपूजनाचा कोणताही कार्यक्रम आयोजित केला नसल्याचे त्यांनी म्हटले होते.