मुंबई - धारावी पुनर्विकास प्रकल्पाची पुनर्निविदा काढून ३७ एकरचा भूखंड गिळंकृत करण्याचा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा डाव असल्याचा आरोप भाजप नेते आशीष शेलार यांनी केला आहे. ठाकरेंच्या वनस्पती आणि प्राणीप्रेमासाठी हे षडयंत्र रचले जात आहे.
आशियातील सर्वांत मोठ्या झोपडपट्टीत (धारावी) मरणयातना भोगणाऱ्या गोरगरिबांना चांगली घरे मिळताहेत, हे त्यांना पाहवत नाही. त्यामुळेच मुंबईच्या सुनियोजित विकासाला ते विरोध करीत असल्याची टीका भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.