टाटा पॉवरच्या स्मार्ट मीटर टेस्टींग लॅबला एनएबीएलची मान्यता

वीज चोरीची माहिती ग्राहकांना मिळणार
electricity
electricitysakal media
Updated on

मुंबई : धारावीतील (dharavi) टाटा पॉवरच्या (tata power) स्मार्ट मीटर टेस्टींग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीला नॅशनल ऍक्रिडिटेशन बोर्ड फॉर टेस्टींग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज (NABL) ने मान्यता दिली आहे. ज्या ग्राहकांना स्मार्ट मीटर्स (smart meters) बसवून घ्यायचे आहेत, अशा ऊर्जा ग्राहकांसाठीही लॅब उपयुक्त ठरणार आहेत. त्याचप्रमाणे ग्राहकांना ऊर्जा वापरावरही नियंत्रण ठेवता येणार आहे.

electricity
सोमवारी महिलांसाठी कोविड 19 विशेष लसीकरण

एनएबीएल ही क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया अंतर्गत काम करणारी स्वायत्त संस्था आहे. कोणत्याही प्रयोगशाळेच्या कार्यक्षेत्रात टेस्टींग आणि कॅलिब्रेशनच्या तांत्रिक क्षमता जोखून त्यांना मान्यता देण्याचे काम एनएबीएल करते. टाटा पॉवरच्या स्मार्ट मीटर्स टेस्ट करण्याच्या क्षमतेला एनएबीएलने मंजुरी दिली आहे. या मान्यतेमुळे कंपनी ग्राहकांना संपूर्णतः स्वयंचलित, अत्याधुनिक सेवा ग्राहकांना देऊ शकणार आहे. तसेच टाटा पॉवर वीज उद्योगक्षेत्रातील इतर कंपन्यांना मदत करून ग्राहकांना लाभ पोचविणार आहे. टाटा पॉवरची स्मार्ट मीटर टेस्टींग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटोरी अत्याधुनिक असून स्मार्ट मीटर्सचे टेस्टींग पूर्ण करण्याची क्षमता यामध्ये आहे. यामध्ये रिमोट कनेक्ट, डिस्कनेक्ट, रिमोट फर्मवेयर अपग्रेडेशन, मीटर डेटा कम्युनिकेशन, टॅम्पर इव्हेन्ट लॉगिंग आणि स्मार्ट मीटर्ससाठी इंटर-लॅबोरेटोरी कम्पॅरिजन टेस्टींग यांचा समावेश आहे.

स्मार्ट मीटर्सचे टेस्टींग करण्याचे आणि रिअल टाइमनुसार मीटर डेटा कम्युनिकेशनवर निगराणी ठेवण्याची क्षमता आमच्या एनएबीएलने मान्यता दिलेल्या मीटर टेस्टींग लॅबमध्ये आहे. ही लॅब म्हणजे आमच्या मुंबईतील ग्राहकांना दिल्या जात असलेल्या सर्वोत्तम सेवांचे प्रतीक आहे. या मान्यतेमुळे ग्राहकांचा स्मार्ट मीटर्सच्या विश्वसनीय टेस्टिंग आणि अचूक कॅलिब्रेशनवरील विश्वास अधिक जास्त मजबूत होईल, टाटा पॉवरचे संजय बंगा यांनी सांगितले.

वीज चोरीची माहिती ग्राहकांना मिळणार

स्मार्ट मीटर्ससोबत असलेल्या माहिती विश्लेषण उपकरणांमुळे ग्राहकांना त्यांनी केलेला ऊर्जा वापर कस्टमर पोर्टल आणि मोबाईल ऍपवर पाहता येतो व त्यावर नियंत्रण ठेवता येते. स्मार्ट मीटर्समुले ग्राहकांना वीज वाया जाण्याचा नेमका स्रोत आणि कारण शोधून काढून आपल्या वीज वापराच्या पद्धतींमध्ये बदल करता येतात आणि अशाप्रकारे त्यांच्या वीजबिलामध्ये बचत होते. स्मार्ट मीटर्समध्ये ऊर्जेचा काही गैरवापर होत असल्यास त्याची देखील माहिती मिळते आणि ग्राहकांना संभाव्य वीजचोरी किंवा गळतीबाबत सूचना दिली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.