धारावी : चामड्याची जागा प्लास्टिक व रबर ने घेतल्यामुळे मृत जनावरांची कातडी काढल्यानंतर कच्चा कातड्याला पक्के कातडे करण्याची पारंपारिक प्रक्रिया करण्याचा व्यवसाय ठप्प पडलेल्या ढोर,ककय्या, कंकय्या आणि डोहर समाजाला आपल्या पारंपरिक कामाला मुकावे लागले आहे. त्यामुळे मुंबईच्या धारावी मधील सर्वात मोठा चामड्याचा उद्योग बंद पडला आहे. म्हणून या समाजाच्या उन्नतीसाठी संत कक्कय्या आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी यासाठी 'वीरशैव कक्कय्या कल्याण मंडळा'च्या वतीने गेल्या तीन वर्षापासून सरकारी दरबारी प्रयत्न करण्यात येत आहेत.
मुख्यमंत्री, मंत्री यांना भेटून निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.पण सरकार या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवार ता. 28 रोजी आझाद मैदानात राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्या नंतरही सरकारने डोळेझाक केली तर मात्र राज्यातील 10 लाख ढोर समाज रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही. असा इशारा महादेव शिंदे , प्रवक्ते रवींद्र शिंदे आणि इतर कार्यकर्त्यांनी आज ता. 25 रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.
राज्य सरकारने मध्यंतरी लिंगायत, रामोशी व अन्य दोन अशा एकूण चार समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली पण आम्ही समक्ष भेटून, तसेच आमदार ज्ञानराज चौगुले यांनी शून्य प्रहाराच्या वेळेत विधानसभेत मागणी करून ही आमच्या समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले नाही. त्यामुळे समाजात सरकार दूजाभाव करत असल्याची भावना पसरली असल्याचे ही महादेव शिंदे म्हणाले. आम्ही समाजाची आर्थिक स्थिती जाणून घेण्यासाठी राज्यात 1800 किलोमीटरचा प्रवास करत 300 तालुके फिरलो असता. समाजाची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याचे भयावह चित्र दिसले. राज्यात ढोर समाजाची संख्या अंदाजे 10 लाख आहे. त्यापैकी 78 टक्के समाजातील कुटुंबप्रमुख मोल मजुरी करून कुटुंबाचे पालन पोषण करीत आहेत.तर 12 टक्के कुटुंब प्रमुख पदपथावर किरकोळ व्यवसाय करून गुजरान करत असल्याचे वास्तव दिसल्याचे प्रवक्ते रवींद्र शिंदे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.