मुंबई : मुंबई आणि परिसरात कोरोनाची (orona)रुग्णसंख्या अद्यापही वाढत असल्याने या परिसरातील इंग्रजी आणि खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा (School)तुर्तास सुरू होणे शक्य नसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनने (मेस्टा) या सोमवारपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी मुंबई, ठाणे परिसरात या शाळा सुरू करता येणार नसल्याने विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
मेस्टाने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण पूर्णपणे उपलब्ध होत नसल्याने सांगत आपल्याशी संबंधित असलेल्या १८ हजाराहून अधिक शाळा १७ जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्याला मुंबई, ठाणे परिसराचा अपवाद असणार आहे. या परिसरातील पालकांनी कोरोनाची रूग्णसंख्या वाढत असल्याने आपल्या मुलांना शाळांमध्ये पाठवणे धोक्याचे ठरेल अशी भीती व्यक्त केली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात १५ फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद ठेवून त्यातील शिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने सुरू ठेवण्यात आले आहे. यासाठी शिक्षण विभागाकडून ऑनलाईन शिक्षण आणि इतर कार्यक्रमांची माहितीही घेतली जात आहे.(Mumbai news)
आरोग्यमंत्र्यांचे शाळा सुरू करण्याचे संकेत
कोरेानाचे रुग्णसंख्या ज्या भागांमध्ये कमी झालेली आहे, त्याचा पुढील १५ दिवसांत आढावा घेऊन शाळा सुरू करता येतील काय याचा विचार केला जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली. यामुळे कोरेानाचे रुग्णसंख्या कमी झालेल्या परिसरात शाळा सुरू करण्याचे संकेत मिळाले असून ५० टक्के क्षमतेने शाळा सुरू होण्याची शक्यता आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.