Digha Railway Station: दिघा रेल्वे स्थानकाचं कधी होणार उद्घाटन? समोर आली महत्वाची माहिती

 Digha Railway Station: दिघा रेल्वे स्थानकाचं कधी होणार उद्घाटन? समोर आली महत्वाची माहिती
Updated on

राज्यात एक पद्धत सुरु झाली आहे एखादा प्रकल्प पूर्ण झाला की त्याच्या श्रेयासाठी लढाई सुरु होते. यात आता आदित्य ठाकरे हे देखील उतरले आहेत असे वाटायला लागले आहे. दिघा रेल्वे स्थानक, माणकोली उड्डाणपूलाचे उद्घाटन होईल. त्याची त्यांनी चिंता करु नये. उद्धाटनासाठी किंवा श्रेयासाठी थांबणारं हे सरकार नाही असा टोला सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.

केंद्र शासनाच्या विकसित भारत संकल्प या उपक्रमांतर्गत केंद्र शासन आणि केडीएमसी आरोग्य विभाग यांच्यावतीने विकसित भारत संकल्प यात्रा सोमवारी काढण्यात आली. भागशाळा मैदान येथे या यात्रेचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पत्रकारांशी बोलताना मंत्री चव्हाण यांनी शासनाच्या विविध योजनाची माहिती व विकसित भारत संकल्प या उपक्रमाची संकल्पना उपस्थितांसमोर मांडली. यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.

 Digha Railway Station: दिघा रेल्वे स्थानकाचं कधी होणार उद्घाटन? समोर आली महत्वाची माहिती
Railway Station Flyover : पुणे रेल्वे स्थानकावरील जुना पादचारी पूल पाडणार

दरम्यान महाराष्ट्रात 40 जोकरांची सर्कस सुरु असून ते सगळीकडे फिरत आहेत. ते काय काम करतात हे आपल्याला दिसत आहे. माणकोली उड्डाणपूल, दिघा रेल्वे स्थानक, उरण लाईन यांसारखी अनेक कामे पूर्ण होऊन देखील त्यांचे उद्घाटन केले जात नाही. अशी अनेक कामे आहेत जी उद्धाटनाची वेळ नाही म्हणून लोकांना त्रस्त ठेवली आहेत. असा टोला आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारला तसेच खासकरुन शिंदे गटाला लगावला आहे.

यावर बोलताना मंत्री चव्हाण म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात केंद्र शासनाच्या अनेक योजना कार्यान्वित होत आहेत. यात रेल्वेच्या ज्या योजना आहेत त्यात 50 टक्के हिस्सा हा महाराष्ट्र राज्य शासनाने दिला पाहिजे होता. गेल्या वेळेच अडिच वर्षाचे जे सरकार होते त्यांनी दिला नाही.

 Digha Railway Station: दिघा रेल्वे स्थानकाचं कधी होणार उद्घाटन? समोर आली महत्वाची माहिती
Diva Railway Station: कोकणात जाणाऱ्या एक्स्प्रेस रेल्वे रखडल्या...प्रवाशांचा संताप, 40 मिनिटे रेलरोको; दिवा रेल्वे स्थानकात मोठा गोंधळ

तो दिला न गेल्याने सर्व कामे महाराष्ट्रात विशेष करुन पाठी राहीली. आणि आता याच, त्याचं उद्घाटन केले नाही अशा ज्या गोष्टी करतात ते किती अयोग्य आहे हे मला माहित आहे. मोठागाव माणकोली पूलाची सुरुवात 2009 ला मी ज्या वेळेला पहिल्यांदा विधानसभेत गेलो त्यावेळेला पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते

. त्यावेळी शेवटच्या टप्प्यात त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली. वित्तीय मान्यता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले तेव्हा मिळाली व त्यांच्याच कार्यकाळात कामास सुरुवात झाली. खरंतर एखादा प्रकल्प जेव्हा पूर्णत्वास जात असतो त्यावेळेला एक पद्धत सुरु झाली आहे.

काम पूर्ण होते त्यावेळी कुठे तरी श्रेय कोणाला मिळाव यासाठी श्रेयाची लढाई प्रत्येकजण करत असतो. त्यात कदाचित आता आदित्य ठाकरे पण उतरले का ? असे मला वाटायला लागले आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सर्व प्रकल्पांचा दररोज आढावा घेतात. कोणता प्रकल्प कशासाठी प्रलंबित आहे, त्यासाठी काय अडचणी आहेत.

 Digha Railway Station: दिघा रेल्वे स्थानकाचं कधी होणार उद्घाटन? समोर आली महत्वाची माहिती
Bhusawal Railway Station : 6 रेल्वेस्थानकांचा होणार कायापालट! विकासकामांचे मोदींच्या हस्ते ऑनलाइन भूमिपूजन

सगळ्या गोष्टींचा मागोवा घेण्याचे काम शासनाच्या माध्यमातून नेहमीच होत असत. किंबहूना गेले अडिच वर्षे जे सरकार त्यात या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष झाले होते. त्याकडे खऱ्या अर्थाने आता जे शासन आलंय ते लक्ष देत आहे. अडिच वर्षात पाठी राहीलेला महाराष्ट्र 1 नंबरवर येण्यासाठी प्रत्येक विभाग आणि त्यांच्या योजनांवर सरकार लक्ष देत काम करत आहे. माझी विनंती आहे, आपण या गोष्टींकडे लक्ष देऊ नका.

दिघा रेल्वे स्थानक, माणकोली उड्डाणपूलाचे उद्घाटन होईल. उद्घाटनासाठी हे सरकार थांबत नाही. काम पूर्ण झाले की त्या ठिकाणी ते खुले केले जाते, त्यामुळे त्याची चिंता करु नका. उद्धाटनासाठी, श्रेयासाठी थांबणारं हे सरकार नाही असा टोला मंत्री चव्हाण यांनी ठाकरे यांना लगावला आहे Digha Railway Station

 Digha Railway Station: दिघा रेल्वे स्थानकाचं कधी होणार उद्घाटन? समोर आली महत्वाची माहिती
Monkey at Railway Station : मनमाड रेल्वेस्थानकावर माकडाच्या मर्कटलीला!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.