हस्तकलेतूून व्यावसायिक भरारी

दिवाळीतील शोभिवंत दीपस्तंभांमधून तरुणांच्या कलेला आयाम
हस्तकलेतूून व्यावसायिक भरारी
हस्तकलेतूून व्यावसायिक भरारीsakal
Updated on

मुंबई :  दिवाळी हा रोषणाईचा सण असल्याने घरासमोर पणत्यांबरोबर दिव्यांची आकर्षक सजावट करण्याकडेही अनेकांचा कल असतो. त्यातच गेल्या दोन-तीन वर्षांपासून मुंबईसह ठाणे परिसरात घरासमोर आकर्षक रोषणाईने परिसर उजळून लावणाऱ्या दीपस्तंभाचा ट्रेंड आला आहे. अशा या दीपस्तंभांची मस्करीतून केलेली घडवण तरुणाईला व्यावसायिक भरारीसाठी उपयुक्त ठरली आहे.

ठाण्यातील तीन मित्र-मैत्रिणींच्या डोक्यातून दीपस्तंभांची ही भन्नाट कल्पना समोर आली आहे. इंटिरियर डिझायनर असलेली भूमिका गोडबोले, फिजिओेथेरपिस्ट तन्वी सावंत आणि तुषार सावंत अशी या तिघांची नावे आहेत. आमच्या संस्थेचे नाव ‘काहीही’ असे आहे. आम्ही तिघेही चार वर्षांपूर्वी सकाळी ९ ते ५ अशी नोकरी करीत होतो; परंतु वर्षभरातच या वेळापत्रकाला आम्ही वैतागलो. व्यवसाय करण्याचा विचार मनात आला; परंतु व्यवसाय म्हटल्यावर जोखीम आली. जरी करायचाच झाला तर नेमका कसला व्यवसाय करायचा, हे सूचत नव्हते. ठाणे शहरात एकदा टपरीवर चहा पीत असताना समोरच्या दुकानाबाहेर पुठ्ठ्यांचे रोल पडलेले दिसले. अंगात कला असल्याने या टाकाऊ वस्तूंचे काही करता येईल का, यासाठी आम्ही विविध प्रयोग सुरू केल्याचे तुषारने सांगितले.

हस्तकलेतूून व्यावसायिक भरारी
दिल्ली : "मला समन्स बजावलेलं नाही"; वानखेडेंचं स्पष्टीकरण

कागदी पुठ्ठ्यांना रंगीत कागद, कापड, टिकल्या, मोती आदींचा वापर करून, या पुठ्ठ्याला दिव्याचे रूप द्यायचे प्रयत्न सुरू झाले. गेली तीन वर्षे या दीपस्तंभांना बरीच मागणी आहे. आम्ही पहिल्या वर्षी ५० ते ६० दीपस्तंभ बनवले. आता चौथ्या वर्षी २ हजारांहून अधिक दीपस्तंभ तयार करून त्याची विक्री सुरू केली आहे. गेल्या वर्षी टाळेबंदी असूनही ७०० दीपस्तंभांची विक्री झाली. हे दीपस्तंभ महाराष्ट्रापलीकडे तमिळनाडू, गुजरात, दिल्लीपासून अगदी दुबई आणि मँचेस्टरपर्यंत पोहोचले आहेत. अजूनही आम्हाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे तुषार याने सांगितले.

आम्हा तिघांना खूप अभिमान

मराठी माणसाला कुठे व्यवसाय जमतोय, असे वाक्य नेहमीच ऐकतो. पण हा आपल्या समाजात असलेला एक गोड गैरसमज आहे. गंमत म्हणजे आम्ही देखील काही वर्षांपूर्वी असाच विचार करणाऱ्या समाजाचा भाग होतो; परंतु आम्ही हस्तकलेतून दीपस्तंभ तयार करून त्यांची विक्री सुरू केली आहे. अनेकांनी आमचा स्तंभ पाहून त्याची नक्कल बनवून स्वतः च्या नावाने विकायला देखील सुरू केले आहे. या व्यवसायात कुटुंबीय आणि मित्रांचा खूप पाठिंबा मिळाला आणि मदतही झाली. हा व्यवसाय अजून मोठा होईल, अशी आम्हाला आशा आहे. मस्करी म्हणून सुरू झालेला हा हस्तकलेचा खेळ आज व्यवसायात परावर्तित झाला आहे, याचा आम्हा तिघांना खूप अभिमान आहे, असे तुषार सावंत याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.