'आम्हाला जगू द्या', दिशा सालियानच्या आईला अश्रू अनावर

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिशा सालियान यांच्या मृत्यूबद्दल काही खळबळजनक वक्तव्य केली होती.
Disha Salian Family
Disha Salian Family Team eSakal
Updated on

दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची (Sushant Singh Rajput case) व्यवस्थापक दिशा सालियान यांच्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे I(Narayan Rane) यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत भाष्य केलं होतं. बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushantsingh Rajput) आणि त्याची मॅनेजर दिशा सालियान (Disha Salia) यांचे मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले होते. त्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी राज्य महिला आयोगाला पत्र लिहिले. दरम्यान, त्या आज थेट दिशा सालियानच्या घरी पोहोचल्या आहेत. यावेळी त्यांच्यासोबत महिला आयोगाच्या सदस्य देखील त्यांच्यासोबत होत्या. त्यानंतर आता दिशाच्या परिवाराने आपल्या भावना व्यक्त केल्या.

Disha Salian Family
असं कोणतं आभाळ कोसळणार आहे? वानखेडेंच्या याचिकेवर HC चा संतप्त सवाल

आम्ही इतकं सारं सहन करतोय. खूप त्रास झाला आम्हाला. राजकारणामुळे आम्हाला या लोकांमुळे आम्हाला जगण्याची इच्छा नाही. आता आम्हाला काय झालं तर यांची जबाबदारी असेल कुणीही नेते, अभिनेते असाल तर आम्हाला त्रास नका देऊ असं तिच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे. यावेळी दिशा सालियानच्या आईला अश्रू अनावर झाले. आता आम्हाला सोडा, आम्हाला जगू दे, सर्वांनाच कळकळीची विनंती करते की आम्हाला त्रास देऊ नका. आम्ही नेत्यांसाठी मते देतात. पण हे लोक आम्हाला आणि मुलीला बदनाम करतात. ती गेली, त्याचं दु:ख आम्ही झेलतोय. पण तिला बदनाम का केलं जातंय. आम्हाला आता पुन्हा त्रास देऊ नका. मी हीच विनंती करेन की त्रास नका देऊ, एकच मुलगी होती. आम्हाला जगू द्या इतकंच सांगेन असं पुन्हा पुन्हा दिशा सालियानच्या आई वडिलांनी सांगितलं.

तिचे कुटुंबीय म्हणाले की, जे आरोप केले जात आहेत त्यात कोणतेही तथ्य नाही. तिचा त्या दिवशी वाढ दिवस होता. म्हणून पार्टीसाठी बोलावलं होतं. बाकी काहीही नाही हे उगाच बदनाम केलं जात आहे. शवविच्छेदन अहवालात काहीही आलेलं नव्हतं. तिचं लग्न होणार होतं, त्या दिवशी तिच्या जवळचे मित्र तिच्यासोबत होते. ते कुणीही कुठेही गेलेले नाहीत. आजही बोलावलं तर तेही समोर येतील. कामाच्या तणावातून तिने आत्महत्या केली. तिने या कामाचा ताण माझ्याजवळ बोलूनही दाखवला होता असं तिच्या आई वडीलांनी सांगितलं आहे.

Disha Salian Family
दिशा सलियन प्रकरणाचा संपूर्ण उलगडा होणार; चंद्रकांत पाटलांनी सांगितली तारीख

दरम्यान, सात मार्चनंतर दिशा सलियन या प्रकरणाचा उलगडा होणार, सर्व पुरावे तयार आहेत, असा गौप्यस्फोट भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. आज ते कोल्हापुरात बोलत होते. दिशा सालियना प्रकरणाचा उलगडा होऊ नये यासाठी शिवराळ भाषेचा वापर सुरु आहे असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.