"दिशाला घाणेरड्या राजकारणाचा बळी ठरवू नका, हे महाराष्ट्राला शोभणार नाही"

दिशा सालियान हीच्या आई-वडिलांची भेट घेतल्यानंतर किशोरी पेडणेकरांनी व्यक्त केल्या भावना
Kishori Pednekar
Kishori Pednekarटिम ई सकाळ
Updated on

मुंबई : दिशा सालियान (Disha Saliya) हीच्या मृत्यूवरुन राजकारण सुरु झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी तिच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली. यानंतर माध्यमांशी बोलताना दिशाचं एक बिझनेस डील फेल गेल्यानंतर नैराश्यातून तिनं आत्महत्या केल्याचं सांगितलं. तसचं या प्रकरणावरुन घाणेरडं राजकारण होऊ नये अशी अपेक्षाही व्यक्त केली. (Disha Saliyan commits suicide after business deal fails dont do dirty politics on it Kishori Pednekar)

Kishori Pednekar
असं कोणतं आभाळ कोसळणार आहे? वानखेडेंच्या याचिकेवर HC चा संतप्त सवाल

महापौर पेडणेकर म्हणाल्या, "दिशा सालियाचा मृत्यू झाला तेव्हापासून आम्ही पोलिसांचा रिपोर्ट आणि तिच्या आई-वडिलांच्या निवेदनाची वाट पाहत होतो. पण या घटनेच्या दोन वर्षांनतरही नितेश राणे आणि नारायण राणे पुन्हा पुन्हा तिच्या आई-वडिलांना त्रास होईल अशा पद्धतीनं बोलत आहेत. सीबीआयचा, शवविच्छेदनाचा आणि पोलिसांच्या अहवालावरही ते अविश्वास दाखवत आहेत. दिशाचे आई-वडील स्वतः सागत आहेत की त्यांच्या फॅमिली पार्टीत ज्यामध्ये दिशाचे लहानपणाचे मित्र-मैत्रिणी होते. यामध्ये ही घटना घडली. घटनेच्या आधी आठवडाभर तिचं एका बिझनेस डीलवर काम सुरु होतं पण यामध्ये तिला अपयश आल्यानं आणि ती खूपच संवेदनशील असल्यानं तिला हे सहन झालं नाही, त्यामुळं तिनं आत्महत्येचा पर्यात निवडला"

Kishori Pednekar
'त्या' चुकीसाठी अमेरिकेच्या प्रसिद्ध कॉमेडियनने मागितली प्रियांकाची माफी

दिशा ही कधीही सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर नव्हती. केवळ एकदाच कॉश्चुम डिझाईनसाठी त्यांची भेट झाली होती. पण तरीही तिच्यावर भलतेच आरोप लावले जात आहेत. याविरोधात मी महिला आयोगाकडे तक्रार केल्याचं कळाल्यानंतर दिशाच्या आई-वडिलांनी मला भेटीसाठी वेळ दिली. आमच्या भेटीदरम्यान दिशाची आई इतकी भाऊक झाली की, वारंवार अशा प्रकारे होत असलेल्या घाणेरड्या राजकारणामुळं आम्हालाही आत्महत्या करावीशी वाटत असल्याचं त्यांनी म्हटलं. या घाणेरड्या आरोपांमुळं आम्ही वर्तमानपत्रही वाचत नाही, सोशल मीडिया वापरत नाही, असंही त्यांनी आम्हाला सांगितलं. त्यामुळं माझी विनंती आहे की ज्या कुटुंबाचा कशाचीच काही संबंध नाही त्या कुटुंबाला आपल्या घाणेरड्या राजकारणाचा बळी बनवू नका. त्यांना त्रास देणं हे महाराष्ट्राला शोभणारं नाही. तुम्हाला याप्रकरणी काही माहिती हवी असेल तर पोलिसांकडे जा, असंही यावेळी महापौर पेडणेकर म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.