Diva Water Issue : पिण्याच्या पाईपांचे रिमॉडलिंग केल्यावरही भीषण पाणीटंचाई; शिवसेनेचा प्रभाग समितीवर पाणी हल्ला बोल मोर्चा

ठाणे महापालिकेत शिंदेचे एकहाती वर्चस्व असतानाही मागील अनेक वर्षे दिव्यातील पाणीटंचाई न सुटल्याने ठाकरेंच्या शिवसेनेने दिवा प्रभाग समितीवर पाण्यासाठी हल्लाबोल मोर्चा काढला.
Diva Water Issue : पिण्याच्या पाईपांचे रिमॉडलिंग केल्यावरही भीषण पाणीटंचाई; शिवसेनेचा प्रभाग समितीवर पाणी हल्ला बोल मोर्चा
Updated on

दिवा - दिव्यातील भीषण पाणीटंचाई, अनियमित पाणीपुरवठा व नागरिकांना पाणी नसताना येणारी भरमसाठ बिले या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेने ठाणे महापालिकेअंतर्गत येणाऱ्या दिवा प्रभाग समितीच्या कार्यालावर पाणी हल्ला बोल धडक मोर्चा काढला. या मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती.

खासदार व शिवसेना नेते राजन विचारे कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत कल्याण जिल्हा प्रमुख सदानंद थरवळ माजी आमदार सुभाषजी भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली दिवा शहर प्रमुख सचिन पाटील, दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे, शहर अधिकारी युवा अभिषेक ठाकूर, उपशहर प्रमुख वैष्णव पाटील, नुकत्याच ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या तन्वी फाउंडेशनच्या अध्यक्षा ज्योती पाटील, उपशहर संघटीका योगिता नाईक, तेजस पोरजी, मयुरी पोरजी यांच्या नेतृत्वाखाली ठाकरेंच्या शिवसेनेचे शिवसैनिक व महिला पाणीटंचाईचा जाब विचारण्यासाठी दिवा प्रभाग समिती कार्यालयावरती धडकल्या.

ठाणे महापालिकेत शिंदेचे एकहाती वर्चस्व असतानाही मागील अनेक वर्षे दिव्यातील पाणीटंचाई न सुटल्याने ठाकरेंच्या शिवसेनेने दिवा प्रभाग समितीवर पाण्यासाठी हल्लाबोल मोर्चा काढत शिंदे गटाच्या मनमानी कारभाराचे वाभाडे काढले.

पाणी चोरी, पाणी विकणारे दलाल आणि टँकर माफियांना पाणी मिळते. मात्र दिव्यातील गोरगरीब जनतेला पाणी का मिळत नाही, असा सवाल ठाकरेंच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पालिका अधिकाऱ्यांना चर्चे दरम्यान केला. यावेळी पालिका प्रशासनाने दिव्यातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू असल्याचे आश्वासन दिले.

महिनाभरात दिव्यातील पाणी प्रश्न न सुटल्यास ठाणे महापालिका मुख्यालयावर शिवसेनेचे शिवसैनिक धडक देतील, असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला. ठाणे महापालिकेत मागील काही वर्षे शिंदेचे वर्चस्व आहे. शिवसेना फुटीनंतर दिव्यातील बहुतांश नगरसेवक हे शिंदे गटात गेले. दिव्यावर याच लोकांचे वर्चस्व असल्याने येथील जनतेला न्याय मिळाला नाही. दिवा शीळ पाईपलाईनला माजी आमदार सुभाष भोईर यांनी मंजूर करून आणली.

2020 मध्ये वर्क ऑर्डर निघाली मात्र खासदार श्रीकांत शिंदे यांना श्रेय हवे असल्याने त्यांनी तीन वर्षे दिवेकारांना पाण्यापासून वंचित ठेवले का? असा आरोप यावेळी दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी केला. तर दिव्यातील नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा होण्यासाठी पाणी चोरांवर कारवाई करा, अशी मागणी ही दिवा शहर प्रमुख सचिन पाटील यांनी त्यावेळी केली.

दिवा शहरातील पाणी टंचाईचा सर्वाधिक फटका हा महिलांना बसत असून विकतचे पाणी घ्यावे लागत असल्याने आर्थिक स्थिती बिघडते. परिणामी शहरातील पाणी समस्या निकालात काढावी, अशी मागणी ज्योती पाटील यांनी केली. दिवा प्रभाग समिती वरील धडक मोर्चा हा ट्रेलर असून दिवा शहरातील पाणी समस्या न सोडवल्यास ठाणे महापालिका मुख्यालयावर प्रचंड आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा ज्योती पाटील यांनी दिला आहे. 

यावेळी उपजिल्हाप्रमुख विजय देसाई, सहसंपर्क प्रमुख अरविंद बिरमुळे, कल्याण लोकसभा संपर्क संघटिका मृणाल यज्ञेश्वर, जिल्हा संघटक कविता गावंड, कळवा शहर प्रमुख चंद्रकांत विधाटे, कळवा शहर संघटक रवींद्र सुर्वे, शहर प्रमुख सचिन पाटील, शहर संघटक रोहिदास मुंडे, युवा शहर अधिकारी अभिषेक ठाकूर, उपशहर प्रमुख वैष्णव पाटील, उपशहर संघटिका योगिता नाईक, उप शहर संघटिका प्रियंका सावंत, शहर सचिव उमेश राठोड, विभाग प्रमुख चेतन पाटील, विभाग प्रमुख मच्छिंद्रनाथ लाड, विभाग संघटीका स्मिता जाधव,  दिवा शहरातील इतर सर्व शिवसेना, युवासेना पदाधिकारी, युवा उपशहर प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख व तमाम शिवसैनिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.