Diwali: दिवाळीच्या पहिल्याच दिवशी म्हणजे रविवारी फटाक्यांमुळे ठाणे शहरात तब्बल आठ ठिकाणी आग लागल्याचा घटनांची नोंद महापालिका आपत्ती कक्षात करण्यात आली आहे. या घटनांमध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही, अशी माहिती आपत्ती कक्षाने दिली.
दिवाळी पहाट होण्यापूर्वीच वाघबीळ शिवकृपा नगर येथे रविवारी मध्यरात्री १२ वाजून आठ मिनिटांनी नारायण पाटील यांनी तात्पुरत्या स्वरूपात उभालेल्या बांबू शेडवरील ताडपत्रीला आणि मंडप साहित्याला आग लागली. दुसऱ्या घटनेत मनोरुग्णालयाच्या आवारामधील एका ताडाच्या झाडाला आग लागली.
तिसरी घटना रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास पारसिक नगर येथे कचऱ्याला आग लागली होती. त्यानंतर ब्रम्हांड रोड येथे मोकळ्या मैदानातील कचऱ्याला आणि महावितरणच्या विद्युत केबलला आग लागली होती. ही आग अर्ध्या तासात नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.
पाचवी घटना ही रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ढोकाळी या ठिकाणी असलेल्या हायलँड गार्डन इमारतीच्या तेराव्या मजल्यावर महेश कुमार यांच्या घराच्या खिडकीमध्ये ठेवलेल्या पिजन नेट आणि इतर साहित्याला आग लागली होती. राबोडी, वृंदावन सोसायटी येथे नारळाच्या झाडाला रात्री आग लागली.
सातवी घटना ही वागळे इस्टेट, रामनगर येथे सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास कचऱ्याला आग लागली. आठव्या घटनेत बाळकूम, दादलानी पार्क येथील सोमवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास मे. धर्मेंद्र कुमार मोटर गॅरेजच्या शेडवरील ताडपत्रीला आग लागली.
…..
नियंत्रणासाठी अर्धा तासाचा कालावधी
शहरात आग लागल्याच्या सर्व घटना जरी किरकोळ असल्या तरी त्या आगी नियंत्रणात आणण्यासाठी अर्धा आणि एक तासाचा कालावधी लागला. या आगी फटाक्यांनी लागल्याची शक्यता ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.