भाऊबीजेच्या गिफ्टचा ट्रेंड बदलतोय; सोने-चांदी, स्मार्ट फोन खरेदीला पसंती

भांडी खरेदीला अपेक्षित प्रतिसाद नसल्याचे दुकानदारांचे म्‍हणणे
Bhaubeej
Bhaubeejsakal media
Updated on

पनवेल : प्रत्येकाच्या आयुष्यात चैतन्य आणि भरभराट घेऊन येणाऱ्या दीपोत्‍सवात भाऊबीजेच्या दिवशी (Bhaubeej) घरोघरी ‘सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळते भाऊ राया रे, वेड्या बहिणीची वेडी ही माया’ या अजरामर गीताच्या ओळी हमखास गुणगुणल्या जातात. या दिवशी मृत्‍यूचा देव आपल्या बहिणीच्या घरी गेला आणि त्याने आपली बहीण यमी हिला मौल्यवान अलंकार (precious ornaments) भेट दिले आणि तिच्या घरी भोजन केले, अशी आख्यायिका आहे. ही प्रथा आजही कायम असून भाऊबीजेच्या दिवशी बहिणीच्या (brother-sister relation) घरी जाताना भाऊ भेट वस्तू घेऊन जातात.

Bhaubeej
कामगारांना पगारवाढ करारातून न्याय; महेंद्र घरत यांचे स्पष्टीकरण

तर बहिणीही लाडक्या बंधुराजासाठी सुग्रास जेवण तयार करून भेटवस्तू देते. शनिवारी (ता. ६) साजऱ्या होणाऱ्या भाऊबीजेकरिता भेटवस्तू खरेदीसाठी पनवेल परिसरातील बाजारपेठेमध्ये गुरुवारी तोबा गर्दी झाल्‍याचे चित्र पाहायला मिळाले. गतवर्षी कोरोनामुळे खरेदीवर निर्बंध आले होते. मात्र यंदा कोरोना रुग्‍णसंख्या आटोक्‍यात आहे.

प्रशासनाने निर्बंधात शिथिलता आणल्‍याने खरेदीला उधाण आले आहे. विविध प्रकारच्या भेटवस्तू विक्रेत्यांनी उपलब्ध असल्याने पनवेल शहरासहित ग्रामीण भागातील ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. भांडी, कपड्यांच्या भेटवस्तू खरेदीचा पूर्वी असलेला ट्रेंड बदलला असून आता महागड्या भेटवस्तू खरेदी करण्याकडे कल वाढला असल्याची माहिती पनवेलमधील व्यावसायिक चंदन शर्मा यांनी दिली आहे.

सोने-चांदीच्या वस्तू खरेदीला प्राधान्य

भविष्यात लहानशी गुंतवणूक आणि भेटवस्तू असा दुहेरी योग साधत ग्राहक सध्या सोन्या-चांदीच्या लहान वस्तूंसोबत इलेक्ट्रॉनिक्स सामान खरेदीला प्राधान्य देत आहेत. चांदीचे चेन, ब्रेसलेट, अंगठी तर सोन्याची पेंडन्ट, अंगठ्या अशा पाच ते १५ हजारापर्यंत वस्तू खरेदीला पसंती मिळत असल्‍याची माहिती कळंबोलीमधील एका ज्वेलर्सचे मालक कमल कोठारी यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()