Mumbai: दिवाळी आणि छटपूजेसाठी गावी जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन भारतीय रेल्वेकडून उत्सव विशेष गाड्या चालविण्यात येत आहेत. मध्य रेल्वेने विशेष गाड्या चालविण्याचा सपाटा लावला असून तरीही प्रवाशांना आरक्षित तिकीट मिळत नाही. तासाभरात उत्तर भारतात जाणाऱ्या उत्सव विशेष गाड्या हाऊसफुल होत आहेत. शनिवारी सीएसएमटी-आगरतला उत्सव विशेष आणि सोमवारी सीएसएमटी-दानापूर उत्सव विशेष गाड्या अवघा ६० मिनिटांत हाऊसफुल झाल्या.
दिवाळी आणि छटपूजेसाठी आपल्या मूळ गावी जाणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गर्दी असून रेल्वे प्रवाशांना सोईसाठी भारतीय रेल्वेकडून यावर्षी सुमारे साडेसात हजार विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. गेल्या वर्षी साडेचार हजार विशेष गाड्या चालवण्यात आल्या होत्या.