..या रुग्णालयात झाली डॉक्‍टरला मारहाण

File Photo
File Photo
Updated on

मुंबई : उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाल्यानंतर पित्याने डॉक्‍टरांना शिवीगाळ करून मारहाण केली. नायर हॉस्पिटलमध्ये शनिवारी पहाटे ही घटना घडली. आग्रीपाडा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

नायर रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक ३३ मध्ये भिवंडीतील पवन दत्तात्रय पाटील (वय १३) याच्यावर उपचार सुरू होते. मेंदूत पाणी झाल्याने तो अनेक दिवसांपासून आजारी होता. त्याची प्रकृती अतिशय नाजूक होती. अशातच त्याचा उपचार सुरू असताना शनिवारी पहाटे ५.१० च्या सुमारास मृत्यू झाला. मुलाचा मृत्यू झाल्याचे समजताच त्याच्या वडिलांनी पवनवर उपचार करणारे डॉ. कार्तिक गजानन आसुटकर (वय २५) आणि त्यांचे सहकारी डॉ. के प्रज्ज्वल चंद्रा चंद्रकांत यांना शिवीगाळ करून मारहाण केली.

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे रुग्णालयात एकच खळबळ उडाली. सुरक्षा रक्षकांनी या प्रकरणाची माहिती आग्रीपाडा पोलिसांना देताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Doctor beaten at Nair hospital

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.