डोंबिवली - शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी या छट पूजेच्या निमित्ताने डोंबिवली येथे गुरुवारी आल्या होत्या. यावेळी त्यांनी भाजप सरकार टीका केली. तर सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर जे भाषण केले त्याचा देखील समाचार घेतला..खासदार चतुर्वेदी म्हणल्या की, ज्याच्यावर टीका करतात त्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व केलं होतं. एक अनुभवी नेते अशी त्यांची ओळख आहे. महाराष्ट्रात नाही तर देशभरात त्यांनी नेतृत्व केलेल आहे. सदाभाऊ खोत त्या पक्षातून येतात ज्यांनी घरामध्ये आग लावलेली, भावा भावाचं भांडण लावलं आहे.शंकराचार्य यांनी स्पष्ट सांगितलं की राजनीति अधर्म नाही तर हिंदू धर्माच्या विरोधात हे अधर्म झालेला आहे. त्यांचे विचार हे, त्यांची घाणेरडी नियत आहे, त्यांच्या शब्दाने समोर येत आहे. त्यांना माहितीये ते हरणार आहेत म्हणून ते अशी टीका करतात..डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार रविंद्र चव्हाण यांच्याविषयी बोलताना त्या म्हणाल्या, येथील आमदार यांना तीन वेळा इकडच्या जनतेने निवडून दिल. त्यांनी कुठलाही विकास केला नाही. त्यांना वाटतं की मला कोणी इकडून हटवू शकत नाही. मात्र त्यांना हटवण्याचा अधिकार छटी मैयाच्या आधारे आम्हाला मिळाला आहे आणि आम्ही ते पूर्ण करणार.नरेंद्र मोदी हे किती वेळा आम्हाला हरवायचं पाठी लागलेले आहेत. मात्र लोकसभेमध्ये 18 पैकी 16 जागांवर ते हरलेले आहेत. जेव्हा जेव्हा नरेंद्र मोदी व अमित शाह इकडे येतील तेव्हा जनतेला ही आठवण येईल की यांनी महाराष्ट्र बरोबर इमानदारी केली नाही. दोन राजकीय पार्टीला तोडण्याचं काम त्यांनी केले आहे. बेरोजगार बनवण्याचे काम, महाराष्ट्राचे उद्योग बाहेर नेण्याचा काम त्यांनी केलेल आहे..महाराष्ट्रात महा भ्रष्टाचार आणि लूट करून हे पैसे दिल्लीला पोहोचवले जातात. हे आम्हाला कधीही मंजूर नाही आम्ही या विरोधात लढाई लढणार. नरेंद्र मोदी सह अमित शहा जेव्हा येईल तेव्हा जनतेला आक्रोश निर्माण होईल आणि याच रूपांतर येणाऱ्या मतदान पेटीमध्ये दिसेल.लाडकी बहीण काँग्रेसने लागू केली होती त्यामुळे आम्ही विरोध कसे करणार. या लोकांनी पंधराशे रुपये लोकसभेच्या पराभव नंतर दिले. हे पैसे नरेंद्र मोदी व एकनाथ शिंदे यांच्या खिशातून नाही येत. हे आमचे पैसे आहेत म्हणून 1500 अजून मिळायला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करतो. यांना माहिती आहे की यांची हार होणार आहे यासाठी आमच्यावर टीका टिपणी करतात असे त्या म्हणाल्या.#ElectionWithSakal.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.