डोंबिवली : परदेशातून आलेल्या 'त्या' रुग्णांचा अहवाल प्रतिक्षेतच!

omicron
omicronSakal media
Updated on

डोंबिवली : केपटाऊन (capetown) येथून डोंबिवलीत (Dombivali) आलेल्या 33 वर्षीय तरुण ओमीक्रॉन बाधित आढळून (omicron patient) आला आणि राज्यात एकच खळबळ उडाली होती. हा रुग्ण बरा होऊन घरी गेला असला तरी त्यानंतर परदेशातून आलेले 8 नागरिक आणि त्यांच्या संपर्कातील 4 नागरिक कोरोना बाधित (corona patients) आढळून आले. त्यांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंग (Genome sequencing) साठी मुंबईला पाठविण्यात आले आहेत. मात्र त्याचा अहवाल अद्याप प्रतीक्षेत (Report still on waiting) आहे. लक्षण विरहित हे रुग्ण असून त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती महापालिका (KDMC) आरोग्य विभागाकडून (Health Authorities) देण्यात आली.

omicron
देसाई - आगासन खाडी परिसरातील आठ गावठी दारुच्या हातभट्ट्या नष्ट

राज्यात ओमीक्रॉन बधितांची संख्या 20 वर पोहोचली आहे. डोंबिवलीत राज्यातील पहिला रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभाग हे सतर्क झालेले पहायला मिळाले. त्यानंतर कल्याण डोंबिवलीत परदेशातून प्रवास करून आलेल्या नागरिकांचा शोध आरोग्य विभागाकडून खबरदारी म्हणून घेतला जाऊ लागला. शासनाकडून 318 नागरिकांची यादी प्राप्त झाली होती. त्यातील 306 नागरिकांना आरोग्य विभागाने ट्रेस केले होते.

यादरम्यान नायझेरियातून आलेले 4, त्यांच्या संपर्कात आलेले 4, दुबई येथून आलेले 2 आणि रशिया व नेपाळ येथून आलेले प्रत्येकी 1 असे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. 6 डिसेंबरच्या आसपास या रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर त्यांना महानगरपालिकेच्या संस्थात्मक विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले होते आणि त्याचे नमुने कस्तुरबा रुग्णालय मुंबई येथे जीनोम स्क्विन्सिंग साठी पाठवण्यात आले होते. त्यांचा अहवाल मात्र अद्याप महापालिकेच्या आरोग्य विभागास प्राप्त झालेले नाहीत. सध्या रुग्णांवर कोरोना उपचार केले जात असून 10 ते 14 दिवस झाल्यानंतर पुन्हा त्यांची कोरोना चाचणी करण्यात येईल. त्याचा अहवाल आल्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आरोग्य विभागाकडून कळविण्यात आले आहे.

omicron
मुंबईतील सक्रिय रुग्णांमध्ये घट; कोरोना नियम पाळण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

राज्यातील पहिला रुग्ण बरा होऊन घरी गेल्यानंतर डोंबिवलीकरांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. काही बेजबाबदार नागरिक मास्क न वापरणे, गर्दी करणे असे प्रकार करत आहेत. यामुळे नागरिकांनी मास्क परिधान करणे ,सॅनिटायझर चा वापर करणे, आणि वारंवार हात धुणे या त्रिसूत्रीचा कटाक्षाने अवलंब करावा असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात येत आहे.

"आरोग्य विभागाच्या संस्थात्मक विलगिकरणात या रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यांना कुठल्याही प्रकारची लक्षणे नसून ते पूर्णपणे लक्षण विरहित आहेत. त्यांचा पुढील कोरोना चाचणी अहवाल काय येतो यावर पुढील निर्णय घेतला जाईल. जिनोम सिक्वेन्सिंगचा अहवाल त्यांचा अजून आलेला नाही. मात्र सर्वांची प्रकृती चांगली असल्याने भीतीचे कोणतेही करण नाही."

- डॉ. प्रतिभा पानपाटील, वैद्यकीय अधिकारी, केडीएमसी, आरोग्य विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.