Dombivali News : थेट केंद्र सरकारलाच लक्ष केल्याने कल्याणच्या ठाकरे गटाच्या मंडळास पोलिसांची नोटीस

कल्याणमधील विजय तरुण मित्र गणेशोत्सव मंडळाने थेट केंद्र सरकारला केले लक्ष.
vijay tarun mandal
vijay tarun mandalsakal
Updated on

डोंबिवली - कल्याणमधील विजय तरुण मित्र गणेशोत्सव मंडळाने थेट केंद्र सरकारला लक्ष केले असून दिल्लीश्वर अर्थात केंद्र सरकारच्या दबावामुळे लोकशाहीचे चार स्तंभ धोक्यात आले असल्याचा देखावा साकारला आहे. या मंडळाचे प्रमुख विजय साळवी हे शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी असल्याने या देखाव्याची चर्चा आणखीनच रंगली आहे. (लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

पोलिसांनी या मंडळास नोटीस बजावली असून मागील वर्षी देखील मंडळाने शिवसेना ही शिवसैनिकांच्या जीवावर आहे हे चित्र दाखविणारा देखावा सादर केला होता. पोलिसांनी त्यावर आक्षेप घेत, नोटीस बजावली होती. यंदाही या मंडळास पोलिसांकडून नोटीस धाडण्यात आली असून पुढे काय भूमिका घेतली जाते हे पहावे लागेल.

कल्याण मधील विजय तरुण मंडळाचा देखावा म्हणजे महत्वाच्या घघामोडी, विषयावर भाष्य करणारा देखावा हे समीकरण ठरलेले आहे. हे विषय मांडताना अनेकदा राजकीय पक्षांवर, विरोधकांवर टिकात्मक भाष्य केले जाते. यंदा या मंडळाचे 60 वे वर्ष असून या मंडळाचा देखावा चर्चेचा विषय ठरला आहे.

'लोकशाहीचे चार ही खांब प्रचंड दबावाखाली आहेत. दिल्लीश्वर म्हणजेच भाजपकडून दबाव टाकला जात आहे. विधीमंडळ, कार्यपालिका, न्यायपालिका आणि प्रसार माध्यमे यांच्यावर कसा दबाव टाकला जात आहे.'' याविषयी भाष्य करणारा देखावा मंडळाने साकारला आहे. या देखाव्यास महात्मा फुले चौक पोलिसांकडून कलम 149 प्रमाणे नोटीस धाडण्यात आली आहे.

गेल्यावर्षी शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर शिवसेना कोणाच्या जिवावर नाही, तर शिवसैनिकांच्या जीवावर आहे. शिवसेना त्याग आणि शौर्यचा इतिहास आहे हे दाखविणाऱा देखावा मंडळाने साकारला होता. पोलिसांनी त्यावेळी नोटीस बजावत मंडळावर कारवाई केली होती. त्यानंतर हा वाद उच्च न्यायालयात गेला होता.

यंदाच्या देखाव्याबाबत मंडळाचे विश्वस्त विजय साळवी म्हणाले, मंडळाचे यंदाचे 60 वे वर्ष आहे. दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या विषयांवर सजावट करत असतो. जो विषय ताजा असतो त्यावर मंडळाचे काय म्हणने आहे हे दाखविणारा देखावा असतो. लोकशाहीचे चार खांब आहेत. त्यांच्यावर प्रचंड दबाव टाकला जात आहे. त्यामुळे ते योग्य न्याय देऊ शकत नाहीत.

या देखाव्यातून भारतातील लोकशाही ही एका दबाव तंत्राखाली असून ती धोक्यात आली आहे. हे दाखविण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. स्वीडनने एक सर्व्हे केला होता, त्यामध्ये त्यांनी असे म्हटले होते की, भारतातील लोकशाही धोक्यात आली आहे. यामध्ये चार खांब विधीमंडळ, कार्यपालिका, न्यायपालिका आणि प्रसारमाध्यमे यांचा समावेश आहे. सध्या भाजपचे सरकार देशात आहे. ते पूर्ण लोकशाही दाबून टाकत आहे.

हूकूमशाही पद्धतीने काम करत आहे. आमच्या मंडळास राजकीय भाष्य दाखविणाऱ्या देखाव्यामुळे पोलिसांनी नोटीस बजावली आहे. या देखाव्यामुळे काही गटामध्ये द्वेष निर्माण झाले तर त्यास मंडळ जबाबदार राहील. नोटीस धाडली तरी आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरेपुर वापर करणार असल्याचे साळवी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.