कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या डोंबिवलीच्या युवकाला उत्तर प्रदेशमधून अटक

culprit arrest
culprit arrestsakal media
Updated on

डोंबिवली - पैसे गुंतवणूक (money investment) केल्यास जास्तीचे व्याजदर (more interest) मिळेल असे सांगत चंकेश जैन (chankesh jain arrest) या डोंबिवलीकर (dombivali) तरुणाने अनेक नागरिकांना कोट्यवधीचा गंडा (crore rupees fraud) घातला आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात (tilak nagar police station) गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला उत्तर प्रदेश (uttar pradesh) येथून अटक केली आहे.

डोंबिवली पूर्वेत बालाजी मंदिर रोड परिसरात चंकेश जैन रहातो. नांदीवली परिसरात राहणारे व्यापारी आदर्श गावडे याना त्याने पैशांची गुंतवणूक केल्यास ज्यादा व्याजदर मिळेल असे सांगितले. तोंडी व करार मध्ये ठरल्याप्रमाणे आदर्श यांनी ऑनलाईन, चेक द्वारे चंकेशला 71 लाख 95 हजार रुपये 1 जुलै 2020 ते 3 ऑगस्ट 2021 या कालावधीत दिले. जास्त व्याज तर नाहीच मात्र गुंतवणूक केलेली रक्कमही परत न देता चंकेश हा गायब झाला होता. याप्रकरणी मंगळवारी 3 ऑगस्ट ला आदर्श यांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपासात चंकेश हा उत्तर प्रदेश येथे पळून गेल्याचे समजताच पोलिसांचे पथक उत्तर प्रदेश ला जाऊन चंकेशला अटक केली.

culprit arrest
राज्यात सुमारे 2000 मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मिती - राजेश टोपे

जास्तीचे व्याजदर मिळेल यालालसापोटी नागरिकांनी आरोपी चकेश जैन यांच्याकडे पैशाची गुंतवणूक करत होते.व्याजदर सोडा गुंतवणूक केलेले रक्कम सुद्धा परत मिळत नसल्याने नागरिकांना त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यासंदर्भात आदर्श गावडेयांनी फसवणूक झाल्याची तक्रार टिळक नगर पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली.पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेतला असता तो उत्तरप्रदेश ला पळून गेले असल्याचे समजले पोलिसांनी त्याला उत्तर प्रदेश वरून अटक केली आहे. गुंतवणूक केलेली रक्कम आरोपी शेअर मार्केट मध्ये गुंतवत असे, अनेक नागरिकांना त्याने कोट्यवधींची फसवणूक केली असून तशा तक्रारी आमच्याकडे येत आहेत.

जयराम मोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त डोंबिवली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.