Thane Crime: तू कुठे जातेस, कोणाशी बोलतेस, माझ्याशी बोलत जा, भेटत जा. नाही बोलली तर कशी कॉलेज शिक्षण पूर्ण करते बघतो, तोंडावर ऍसिड फेकेल अशी धमकी एका 17 वर्षीय विद्यार्थिनीला 28 वर्षीय तरुणाने दिल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून नितेश गायकवाड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलगी ही परिवारासोबत खिडकाळी परिसरात रहाते. तर नितेश हा पडले गावात रहातो. नितेश हा पीडित मुलीच्या परिचयाचा आहे. डोंबिवली येथील के.व्ही. पेंढरकर महाविद्यालयात मुलगी शिक्षण घेत आहे. शनिवारी सकाळी कॉलेज मध्ये जाण्यासाठी विको नाका येथे बसमधून ती उतरली. तेथून ती पायी पेंढरकर महाविद्यालयाकडे चालत येत होती.
यादरम्यान नितेश हा रिक्षातून तेथे आला. मुलीला जबरदस्ती रिक्षात बसवून आर. आर. रुग्णालय येथून एमआयडीसीतील कावेरी चौकातून सोनिमा इमारत समोरील एका झाडाखाली रिक्षा उभी केली. रिक्षा बंद करून तो मागच्या आसनावर बसलेल्या अल्पवयीन विद्यार्थीजवळ आला.
तिची मान मुठीत जोराने पकडून तिचे हात पकडून तिला, तू कुठे जातेस, तू कोणाशी बोलतेस, माझ्याशी संपर्क का ठेवत नाहीस, माझ्याशी बोलत जा, भेटत जा, अशी दटावणी केली. यावेळी मला तुझ्याशी बोलायचे नाही असे मुलीने त्याला सांगताच त्याने रागात तू सोमवारी मला भेट, नाही तर तू कसे शिक्षण पूर्ण करते ते मी बघतोच, तुझ्या तोंडावर ऍसिड फेकतो असे बोलून शिवीगाळ करत धमकी दिली.
मुलीने घाबरून घरी हा प्रकार सांगितला असता कुटुंबीयांनी मानपाडा पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली आहे. दाखल तक्रारीवरून पोलिसांनी बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याने गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.