डोंबिवली : मानपाडा पोलीस ठाण्यात (Manpada police station) चोरीच्या गुन्ह्यातील अटक आरोपी राजकुमार बिंद (Accused Rajkumar bind) (वय 30) याला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाची लागण झाली होती. उपचारासाठी त्याला टाटा आमंत्रा येथे दाखल करण्यात आले होते. संधीचा फायदा घेत 10 मे ला राजकुमार पोलिसांची नजर चुकवून फरार झाला. तेव्हापासून पोलीस त्याच्या शोधात होते. मोबाईल, सिम कार्ड सतत बदलून पोलिसांना चार महिने चकवा दिल्यानंतर दादरा नगर हवेली येथे तो स्थिर स्थावर झाला असता त्याला सोमवारी सकाळी मानपाडा पोलिसांनी (Manpada police) अटक करत (culprit arrested) डोंबिवलीत आणले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे (Shekhar bagade) यांनी दिली.
डोंबिवली पूर्वेतील गोलवली येथे राहणार राजकुमार बिंद हा एका कंपनीत कामास होता. मानपाडा पोलीसांनी चोरीच्या गुन्ह्यात त्याला अटक केली असता त्याच्यावर चोरीचे अनेक गुन्हे असल्याचे उघड झाले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोठडीत असताना राजकुमारला कोरोनाची लागण झाल्याने त्याला कोनगाव येथील टाटा आमंत्रा येथील कोविड केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी पोलिसांचा पहारा असतानाही पोलिसांच्या हातावर तुरी देऊन कोविड केंद्राच्या 15 व्या मजल्यावरून राजकुमारने 10 मे 21 रोजी पळ काढला होता. या प्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तेव्हापासून मानपाडा पोलीस राजकुमारचा शोध घेत होते. राजकुमार हा उत्तरप्रदेश येथील मिर्झापूर या त्याच्या गावी पळून गेला होता. तांत्रिक विश्लेषणद्वारे पोलीस त्याचा शोध घेत असताना तो सतत मोबाईल फोन, सिम कार्ड चेंज करत होता. राहाण्याचे ठिकाण देखील तो बदलत असल्याने पोलिसांच्या तावडीत सापडत नव्हता. 10 सप्टेंबरला तो दादरा नगर हवेली या केंद्रशासीत प्रदेशाची राजधानी असलेल्या सिल्वासा शहरात गेला. तेथे एका कंपनीत काम करत तो तेथे स्थिर स्थावर झाला असता डिसेंबर मध्ये मानपाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वनवे, पोलीस हवालदार राजेंद्र खिलारे, विजय कोळी, पोलीस नाईक दीपक गडगे, भारत कांदळकर, प्रविण किनरे यांचे पथक दादरा नगर हवेलीला रवाना झाले.
तेथे सोमवारी सकाळी त्याला पोलिसांनी अटक करून डोंबिवलीत आणले. राजकुमार हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून कोरोना काळात तो पळून गेला होता. तेथे तो कंपनीत नोकरी करत होता. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर करून त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बागडे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.