डोंबिवली : दहा दिवसांत तीन तडीपार गुंडांचा घेतला शोध; तिघांना अटक

कल्याण गुन्हे शाखा युनिट 3 ची कामगिरी
Culprit arrested
Culprit arrestedsakal media
Updated on

डोंबिवली : रामनगर पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेला तडीपार गुंड (Extern culprit arrested) संकेत गायकवाड (sanket gaikwad) (वय 23) याला कल्याण गुन्हे शाखा युनिट 3 ने शुक्रवारी अटक केली. यापूर्वी सनी जाधव (sunny jadhav) व कैलास जोशी (kailas joshi) याला डोंबिवलीतून अटक करण्यात आली आहे. दहा दिवसांत तीन तडीपार गुंडांना कल्याण गुन्हे शाखेने (Kalyan crime branch) अटक केली आहे.

Culprit arrested
MIMच्या रॅलीला परवानगी नाही; Omicron मुळं मुंबईत जमावबंदी

रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अग्निशस्त्र जवळ बाळगणे, रॉबरी, घरात घुसून मारणे यांसारखे गुन्हे संकेत गायकवाड याच्यावर दाखल आहेत. 24 ऑगस्ट 21 पासून दोन वर्षे कालावधीसाठी त्याला तडीपारीचे आदेश देण्यात आले आहेत. तडीपारीचे आदेश असताना डोंबिवली परिसरात तो फिरत असल्याची माहिती गुन्हे शाखेस मिळाली होती. शुक्रवारी दुपारी संकेत हा पूर्वेतील पी. एन. टी. कॉलनीतील आगरी खानावळ येथील बाकड्यावर बसलेला असल्याची माहिती पोलीस हवालदार दत्ताराम भोसले यांना मिळाली. त्यांनी याविषयी गुन्हे शाखा युनिट 3 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर पाटील यांना दिली.

त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण दायमा, पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर यांसह पोलीस हवालदार विश्वास माने, गुरुनाथ जरग, वसंत बेलदार, सचिन वानखेडे, महेश साबळे यांचे पथक घटनास्थळी गेले. तेथे संकेत हा मित्रांसोबत गप्पा मारत बसला असता, सापळा रचून त्याला पोलिसांनी अटक केली. आदेशाचा भंग केल्याने कायदेशीर कारवाई करून पुढील तपासाकरीता संकेत याला मानपाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 3 तडीपार गुंडांना कल्याण गुन्हे शाखेने दहा दिवसांत अटक केल्याने त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.