डोंबिवली : दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांना पोलिसांनी केली अटक ; पिस्तूल जप्त

1 लाख 60 हजार रुपयांच्या मुद्देमालसह दोघांना अटक
Culprit arrested
Culprit arrestedsakal media
Updated on

डोंबिवली : दुचाकीस्वाराला कट मारल्याचा राग आल्याने रिक्षाचालकासह (Rikshaw driver beaten case) त्याच्या साथीदाराला दुचाकीस्वारासह 10 ते 15 जणांनी मारहाण केल्याचा घटना डोंबिवलीत (Dombivali) उघडकीस आली होती. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात (Ramnagar Police station) गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आरोपी अमोल याने पिस्तुलचा धाक दाखवून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. यात पोलीसांनी अमोल याच्याजवळील पिस्तूल ताब्यात (Gun Seized) घेत त्याला अटक केली. सिद्धार्थ मोरे याला आधीच पोलिसांनी अटक केली (culprit arrested) आहे. विना परवाना पिस्तुल अमोलकडे कोठून आली याचा तपास पोलीस करत आहेत.

Culprit arrested
झोपी गेलेल्या केंद्र सरकारला कामगारप्रश्नी जागे करायचे आहे - सचिन अहिर

डोंबिवली पूर्वेतील इंदिरानगर परिसरात राहणारे रिक्षाचालक राजेश भालेराव रिक्षाने जात असताना स्कुटी चालकास कट मारल्याने सिद्धार्थ मोरे यांच्यासोबत राजेश यांचा वाद झाला होता. 13 तारखेला रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास सिद्धार्थ याने अमोल व त्यांच्या 10 ते 15 साथीदारासह भालेराव याना इंदिरा चौकात गाठत बेदम मारहाण केली. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली होती. रामनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल होताच, पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. इंदिरानगर परिसरात पोलिसांना बंदुकीची गोळी आढळून आली.

पोलिसांना संशय आल्याने त्यांनी या प्रकरणी अमोल व सिद्धार्थ यांना ताब्यात घेतले. पोलीसी खाक्या दाखविल्यानंतर अमोलने त्याच्या जवळील पिस्तुल भांडणा दरम्यान काढत असताना पिस्तूल मधून गोळी पडल्याचे सांगितले. पोलिसांनी अमोलला अटक केली असून अमोल आणि सिद्धार्थकडून 60 हजार किंमतीची पिस्तुल, एक जिवंत राऊंड, दोन दुचाकी असा एकूण 1 लाख 60 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अमोल यांच्याजवळ सापडलेले पिस्तुल हे विना परवाना असून त्याने ते कोणाकडून व कशासाठी खरेदी केले होते याचा तपास सूरी असल्याची माहिती डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त जे. डी. मोरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.