डोंबिवली - ठाणे जिल्ह्यावर वर्चस्व कोणाचे यावरून सध्या शिंदे भाजप गटात चढाओढ लागली आहे. मानपाडा पोलीस ठाण्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीवरून मित्र पक्षातील हा वाद उफाळून आला आहे. ठाणे जिल्हा आमचाच असा दावा भाजप शिंदे गटाकडून होत असतानाच मनसेचे एकमेव कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी मात्र एक वेगळाच गौप्यस्फोट केला आहे. शिंदे भाजपा एकाच थाळीचे चट्टे पट्टे आहेत.
कल्याण लोकसभेत शिवसेनेचाच खासदार असणार असे पाटलांनी सांगितले आहे.
डोंबिवली येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पक्षातील पदाधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनसे नेते अनिल शिदोरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शिबिरानंतर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना वरील गौप्यस्फोट केला.
कल्याण लोकसभा मतदारसंघात मित्र पक्षात सुरू असलेल्या वादावर ते म्हणाले, हे एकाच थाळीचे चट्टेपट्टे आहेत. एका पोलीस अधिकाऱ्यावरून एवढ मोठा राजकारण करण्याच काही कारण नाही. गृहखाते यांच्याकडे आहे. तडकाफडकी बदली करायची असेल हे करू शकतात. कुठेतरी लक्ष लक्ष वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे त्याच्यात त्यांना काही प्रमाणात यश मिळत आहे.
सध्या जे सर्व्हे आलेले आहेत. आरएसएस किंवा इतर काही लोकांचे त्यात विशेषतः शिंदे गटाला खूप कमी स्थान दिलेल आहे. जन सामान्यांचे त्याच्यावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी चाललेली ही खेळी आहे का ? असा संशय येतो. यांची सवयच आहे 2014 ला ही लोक रस्त्यावर भांडतात तसे भांडत होते. नंतर यांनी युती केली लोकांचा कुठेतरी लक्ष दुसरीकडे वेधन्यासाठी चाललेले यांचे प्रयत्न असे मला संशय असल्याचे आमदार पाटील म्हणाले.
इथे शिवसेनेचाच उमेदवार भविष्यात येणार आणि हे सगळे एकत्र येऊन काम करतील हे नक्की. शंभर टक्के यांची युती होणार. फक्त फिरवा फिरवीचं काम सुरू आहेत दुसरं काही नाही. लोकांनी यांच्या कामावर लक्ष द्यावे. जे कर्म करतात त्याच्यावर लक्ष द्यावे. रस्त्याची कामासाठी भरभरून निधी आणला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर.आता शाळा सुरू झाल्या आहेत, पावसाळा तोंडावर आला आहे. 15 दिवसात काय हालत होते पहा. रस्त्याचे काम अपूर्ण आहेत त्यांना पर्यायी रस्ता डांबरीकरण केलं नाहीये. या सर्व गोष्टी कडून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी यांची चाललेली ही खेळी आहे. इथे शिवसेनेचाच उमेदवार येणार भविष्यात आणि हे सगळे एकत्र येऊन काम करतील हे नक्की असे विधान पाटील यांनी केले.
आळंदीला झाला तो समस्त महाराष्ट्र मधील वारकऱ्यांचा अपमान ...अमानुषपणे वागने हे निषेध करण्यासारखे
जो प्रकार आळंदीला झाला तो समस्त महाराष्ट्र मधील वारकऱ्यांचा अपमान आहे. ती घटना खूप दुर्दैवी आहे. गृह मंत्रालयाने याची दखल घ्यायला हवी. पोलीस पोलिसांच काम करतात हे मान्य आहे. परंतु कोणासमोर कसं वागायचं. वारकऱ्यांना एक शिस्त असते त्यांचा कार्यक्रम पोलीस नसले तरी शिस्तबद्ध पद्धतीने दरवर्षी करत असतात ते. हे जरा जास्त अमानुषपणे वागले ही निषेध करण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळे दोन्ही प्रकारे सांगड घालून चालणार नाही. मला राजकारणावरती बोलायचं नाही कारण परिस्थिती तशी नाहीये जे झालं निंदनीय आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.