डोंबिवली : वीज मीटरमध्ये छेडछाड करत डोंबिवलीतील (Dombivali) उर्मी या हॉटेल मालकाने तब्बल 7 लाख 59 हजार रुपयांची वीज चोरी (electricity robbery) केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी हॉटेल मालक पुनीत शहा (punit shah) यांच्या विरोधात महात्मा फुले चौक (mahatma phule chauk police) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (police FIR) करण्यात आला आहे. हॉटेल मालकाने चोरी केलेल्या विजेची 7 लाखाची रक्कम महावितरणकडे भरली (MSEB) असून दंडाच्या रक्कमेचा भरणा अद्याप बाकी आहे.
डोंबिवली पूर्वेतील फडके रोडवर उर्मी हॉटेलमध्ये गेल्या 11 महिन्यात 46 हजार 523 युनिट ची सुमारे 7 लाख 59 हजार रुपये किमतीची वीज चोरी केली केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रमोद पाटील, सहायक अभियंता योगिता कर्पे व संतोष बोकेफोडे यांच्या पथकाने केलेल्या कारवाईत हॉटेलच्या मीटरचा डिस्प्ले नादुरुस्त झाल्याचे व मीटरशी छेडछाड केल्याचे तपासणीत आढळून आले.
हे संशयित मीटर ताब्यात घेऊन ग्राहकासमक्ष महावितरणच्या कार्यालयात अधिक तपासणी करण्यात आली. यात अतिरिक्त सर्किटच्या माध्यमातून मीटर बायपास करून वीजचोरी केल्याचे निष्पन्न झाले. सहायक अभियंता योगिता कर्पे यांच्या फिर्यादीवरून हॉटेल चालक पुनीत शहा याच्या विरुद्ध वीज चोरीचा गुन्हा महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून पोलीस उप निरीक्षक रज्जाक शेख या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान हॉटेल चालकाने चोरी केलेल्या विजेचे 7 लाख 59 हजार रुपयांचे बिल भरले आहे व दंडाच्या आकारणीची मागणी केली असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.