कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची बनावट बांधकाम परवानगी पत्र सादर करुन रेराचा नोंदणी क्रमांक मिळवित अनधिकृत बांधकाम केडीएमसी हद्दीत करण्यात आले आहे.
डोंबिवली - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची बनावट बांधकाम परवानगी पत्र सादर करुन रेराचा नोंदणी क्रमांक मिळवित अनधिकृत बांधकाम केडीएमसी हद्दीत करण्यात आले आहे. याप्रकरणाची विशेष तपास पथकाकडून चौकशी सुरु असून बुधवारी चार विकासक आणि एका एजंटला पथकाने अटक केली आहे. सुनिल मढवी, आशु मुंगेश, रजत राजन आणि राजेश पाटील हे चार विकासक तर दलाल मुकूंद दातार अशी अटक आरोपींची नावे आहेत.
कागदपत्रे बनावट आहेत हे माहित असूनही ती रेरास सादर करत अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापूर्वीही पाच एजंटना तपास पथकाने अटक केली आहे. त्यामुळे आत्तापर्यंत 10 जणांना या प्रकरणात अटक करण्यात आली असल्याची माहिती तपास पथक प्रमुख सरदार पाटील यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या बनावट बांधकाम परवानगीची कागदपत्रे तयार करत रेराचा नोंदणी क्रमांक मिळवित कल्याण ग्रामीण परिसरात बेकायदा बांधकामे उभी राहीली आहेत.
बेकायदा बांधकामे उभारत महानगरपालिकेचा विकास अधिभार बुडविला गेल्याने शासनाची आणि सर्वसामान्य फसवणुक केल्याप्रकरणी वास्तूविशारद संदीप पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ ्सून रेराने फसवणूक झाल्याप्रकरणी 65 बांधकामांची परवानगी रद्द केली होती. यानंतर पालिकेने याची चौकशी करत 65 विकासकांविरोधात मानपाडा व डोंबिवली पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले. एसआयटीकडून सध्या या प्रकरणाचा तपास सुरु असून ईडीने देखील याची चौकशी सुरु केली आहे. सदर गुन्ह्यांमध्ये एकूण 65 सर्व्हेवरील जमिनींवर बनावट बांधकाम परवानगीच्या आधारे महारेरा नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करून मोठया प्रमाणात अनधिकृत बांधकामे करण्यात आलेली आहेत. त्याद्वारे महानगरपालिकेचा विकास अधिभार बुडविला गेल्याने शासनाची आणि सर्वसामान्य फसवणुक केली असल्याने अश्या अनधिकृत बांधकाम करणारे भूमाफिया सक्रिय असल्याचे निष्पन्न झाले असता.
विशेष तपास पथकाने प्रत्यक्ष घटना स्थळांची पहाणी, कागदपत्रांची छाननी सुरु करत तपासाला वेग दिला असता महापालिकेच्या नावे बनावट कागदपत्र तयार करणे, खोटे सही, शिक्क्यांचा वापर करणाऱ्या प्रियंका रावराणे मयेकर, प्रवीण ताम्हणकर,राहुल नवसागरे,जयदीप त्रिभुवन , कैलास गावडे या पाच एजंटना नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला अटक केली होती. सध्या यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. अनधिकृत बांधकाम करणारे विकासक, जमिन मालक, ठेकेदार यांची माहिती मिळवित हे एजंट त्यांना आपली पालिकेत ओळख आहे. तुम्हाला पालिकेची परवानगी मिळवून देतो असे सांगत त्यांच्या पैसे लाटत महिना भराच्या कालावधीत त्यांना बनावट बांधकाम परवानगीची कागदपत्र हे एजंट बनवून देत असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. पालिकेतील अधिकारी, विकासक, जमिन मालक, कंत्राटदार यांचीही माहिती मिळवित तपास पथकाचा त्यादिशेने तपास सुरु आहे.
या दरम्यान विकासक सुनिल मढवी, आशु मुंगेश, रजत राजन आणि राजेश पाटील यांनी बनावट बांधकाम प्रमाणपत्र रेरास सादर करीत त्यांची परवानगी मिळवित ही बांधकामे उभारली आहेत. कागदपत्र तयार करुन देण्यात मुकूंद दातार या एजंटचा देखील समावेश असल्याचे निष्पन्न झाले असता बुधवारी विशेष तपास पथकाने त्यांना अटक केली. विकासकांना सदर कागदपत्र ही बनावट असल्याचे माहित असून देखील त्यांनी हे व्यवहार करत अनधिकृत बांधकामे उभारल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याचा पुढील तपास सुरु असून यामध्ये आणखी विकासकांना देखील पुढे अटक होण्याची शक्यता आहे. विकासकांना अटक झाल्याने पालिकेतील अधिकारी वर्गाचे धाबे दणाणले असल्याचे दिसून येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.