Dombivali News : डोळ्यातील अश्रू त्यांच्या लिखाणात आले; नरेश म्हस्के यांचे आमदार राजू पाटील यांच्या ट्विटला उत्तर

दिवा बेतवडे येथे आगरी कोळी वारकरी भवन उभे राहणार आहे. या आगरी कोळी वारकरी भवनच्या भूमिपूजन आधीच शिवसेना शिंदे गट आणि मनसे यांच्यात वाद सुरू झाला आहे.
Naresh Mhaske and Raju Patil
Naresh Mhaske and Raju Patilsakal
Updated on

डोंबिवली - गेले कित्येक वर्ष आगरी कोळी वारकरी भवन व्हावं हि आगरी कोळी समाजाची मागणी होती. कदाचित मनसे आमदार समाजाची ही मागणी पूर्ण करू शकले नाही. शिवसेना खासदारांनी ती मागणी पूर्ण केली याच आमदारांना वाईट वाटलं असावं. त्यामुळे त्यांच्या डोळ्यातील अश्रू लिखाणातून आले असावे असे उत्तर शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी मनसे आमदार राजू पाटील यांच्या ट्विटला दिले आहे.

दिवा बेतवडे येथे आगरी कोळी वारकरी भवन उभे राहणार आहे. या आगरी कोळी वारकरी भवनच्या भूमिपूजन आधीच शिवसेना शिंदे गट आणि मनसे यांच्यात वाद सुरू झाला आहे. वारकरी भवन यासोबतच दिव्यातील विकास कामांवरून देखील शिंदे गटाला लक्ष केले जात आहे. उडघटनाच्या पूर्वसंध्येला लोकार्पण होणारी नवीन मुख्य जलवाहिनी लिकेज झाल्याची घटना घडली. या घटनेवरून कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विट केले होते.

Naresh Mhaske and Raju Patil
Cyclone Biparjoy : मुंबईसह कोकणात ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ धडकणार, नागरिकांसह मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा!

मुख्यमंत्री शिंदे दिव्यात दाखल होण्याआधी जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. जलवाहिनी लिकेज झाल्याने मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ट्विट करताना म्हटले आहे. "आज मुख्यमंत्री दिव्यातील रस्ते आणि पाणी विकास कामाचे लोकार्पण करण्यास येणार आहेत. हे समजताच दिव्यातील रस्त्याला पाझर फुटला. दिवेकरांनो काळजी नसावी काम चालू आहे...वर्षानुवर्ष". तर दुसरीकडे दिवा भाजप अध्यक्ष रोहिदास मुंडे आणि उद्धव ठाकरे गटाकडून सुद्धा टीका करण्यात आली आहे. असे आमदार पाटील यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले होते.

या ट्विटला उत्तर देताना शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के म्हणाले, गेले कित्येक वर्ष आगरी कोळी वारकरी भवन व्हावं हि आगरी कोळी समाजाची मागणी होती. कदाचित मनसे आमदार समाजाची ही मागणी पूर्ण केली. याच त्यांना वाईट वाटल आहे. त्यामुळे त्यांच्या डोळ्यातील आश्रु त्यांच्या लिखाणात आले आहेत असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.