उपमुख्यमंत्री देवेंद्र यांनी अडीच वर्षात राज्यातील महाविकास आघाडी सरकार उलथवून लावत, जनतेच्या मनातलं सरकार आणलं.
डोंबिवली - पवार कुटुंबीयांना देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल प्रचंड आकास आहे. कारण या महाराष्ट्रामध्ये पवारांशिवाय दुसरा कोणी मोठा नेता नाही, अशा प्रकारचा त्यांचा एक समज होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र यांनी अडीच वर्षात राज्यातील महाविकास आघाडी सरकार उलथवून लावत, जनतेच्या मनातलं सरकार आणलं. त्यामुळे स्वाभाविक पवार कुटुंबियांच्या मनामनात द्वेष भरलेला आहे. त्याच गत्यंतर वारंवार पवार कुटुंबातील सदस्यांकडून होणाऱ्या टिकेतून दिसून येते. फडणवीस यांच्याशिवाय टीका करायला नेतृत्व कुठे आहे. म्हणून अशा प्रकारे आकसाने केलेली टीका आहे. या पलीकडे या टिकेला काही महत्व नाही असा टोला भाजपा आमदार आणि माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांना लगावला.
भाजपचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांनी डोंबिवलीत आयोजित केलेल्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी कब्बडी चषक 2023 या स्पर्धेला भाजप आमदार आणि माजी विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित लावली होती.
पुण्यात कोयता गँगने धुडगूस घातला आहे. त्यामुळे येथील नागरीक भयभीत झाले आहेत. त्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेरल आहे. राज्यात सातत्याने कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न समोर आले आहेत. दौंडमधली गुन्हेगारी, खून, पुण्यातील कोयता गँग, महिलांवर अत्याचार हे सातत्याने राज्यात होत आहे. राज्यात एवढं सगळं होतंय हे गृहमंत्रालयाचे अपयश आहे. त्यामुळे जमत नसेल तर देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. हे माझं वैयक्तिक मत आहे, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीस यांना सुनावले आहे. याविषयी बोलताना आमदार दरेकर म्हणाले,
पवार कुटुंबीयांना देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल प्रचंड आकास आहे. कारण या महाराष्ट्रामध्ये पवारांशिवाय दुसरा कोणी मोठा नेता नाही, अशा प्रकारचा त्यांचा एक समज होता. फडणवीस यांनी पाच वर्षे मुख्यमंत्री पद घेऊन महाराष्ट्राला विकासाकडे नेले. अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकार उलथवून लावत जनतेच्या मनातलं सरकार आणलं. स्वाभाविक त्यांच्यामुळे पवार कुटुंबियांच्या मनामनात द्वेष भरलेला आहे. आणि त्याच गत्यंतर वारंवार अधूनमधूम येणार, कधी अजित पवार यांच्या मुखातून येत, कधी रोहित पवार, कधी सुप्रिया ताई यांच्या मुखातून येते, आणि अधून मधून पवार साहेबांच्या ही येत.
मुख्यमंत्री आमचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजींना जमत की नाही झेपत हे पाच वर्ष मुख्यमंत्री पदाचा कारभार दाखवत त्यांनी महाराष्ट्राला दाखवून दिले आहे. म्हणून आमची सत्ता पुन्हा त्या ठिकाणी राज्यातील जनतेने आणली. गृहमंत्री म्हणून या ठिकाणी अत्यंत उत्तम काम देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली चाललय. आता त्यांना या सत्तेचा पोटशूळ आहे. शिंदे फडणवीसांची जोडी उत्तम पद्धतीने काम करते. आपलं राजकीय भविष्य काय याची चिंता आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय टीका करायला नेतृत्व कुठे, म्हणून अशा प्रकारचे आकसाने केलेली टीका आहे. या पलीकडे या ठीके ला महत्त्व देण्याचे काही कारण नाही असे दरेकर म्हणाले.
सगळे आमदार संतुष्ट आहेत - प्रवीण दरेकर
मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस होते, त्यानंतर विस्तार झाला, कुठे आला असंतोष. सरकार लोकांसाठी काम करतय प्रश्न आमच्या संतोष, असंतोषाचा नाहीये. राज्यातील जनतेला विकासावर प्रगती हवी आहे आणि आज तो पूर्ण विश्वास शिंदे व फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी राज्यातील जनतेला मिळतोय. त्याच्यामुळे आम्हा आमदारांना काय मिळतं हे महत्त्वाचं नाही. सगळे आमदार संतुष्ट आहेत, या सरकारच्या माध्यमातून लोकांचे काम होत आहेत. त्यांना आनंद मिळतो, आणखीन काम होतील. आणि त्यामुळे आमचं मंत्रीपदाची संतुष्ट - असंतुष्ट असण्याची काही देणं घेणं नाही. सर्व एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजींची टीम अत्यंत एक जीनसाने काम करत आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करते आणि करत राहील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.