डोंबिवली : डोंबिवलीत (dombivali) अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार (minor girl rape) झाल्याची घटना सप्टेंबर महिना अखेरीस उघडकीस आली होती. यामध्ये मानपाडा पोलिसांनी (Manpada police) एकूण 33 जणांना अटक केली आहे. नांदीवली गावात (Nandivali village) राहणारा 34 वा आरोपी मात्र महिना उलटला तरी मोकाट फिरत (culprit escapee) आहे. पोलिसांचे विशेष पथक (police special team) या आरोपीच्या शोधासाठी विविध ठिकाणी रवाना करण्यात आले होते. मात्र त्याचा शोध घेण्यात पोलीसांना यश आलेले नाही.
डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना 23 सप्टेंबरला उघडकीस आली होती. मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी या घटनेतील 33 आरोपींना अटक केली. दोन आरोपी अल्पवयीन असून त्यांची बालसुधार गृहात तर 31 आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. यामध्ये मानपाडा पोलिसांनी पाच वाहने, अमली पदार्थ यांसह विविध पुरावे गोळा केले आहेत. घटना घडलेल्या ठिकाणाचेही पंचनामे करण्यात आले आहेत. मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पोलीस लवकरच कल्याण जिल्हासत्र न्यायालयात याप्रकरणी चार्जशीट दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मानपाडा पोलिसांनी दिली.
या प्रकरणातील 34 वा फरार आरोपीला शोधण्यात मात्र पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पोलीस पथक, गुप्त बातमीदार, नातेवाईक, मोबाईल लोकेशन आदी पद्धतीने पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. मात्र नांदीवली गावात राहणारा 34 वा आरोपी हा संपूर्ण परिवारासह गावातून गायब झाला आहे. त्यांचे मोबाईल देखील बंद असल्याने त्यांचा शोध लागला नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. यातील सर्व आरोपी अटक झाले असताना एका फरार आरोपीचा शोध पोलिसांना घेता न आल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. या घटनेला महिना उलटला असून एरवी काही तासांत आरोपींचा शोध घेणारे मानपाडा पोलीस याला मात्र पकडू शकलेले नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.